आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जगभरात काेराेना लसीचा टप्पा सुरू असतानाच त्याविराेधात अपप्रचारही वाढताेय. रिपब्लिकनचे खासदार रँड पाॅल यांनी फायझर व माॅडर्नाची लस ९० ते ९४.४ टक्के प्रभावी असल्याचे वादग्रस्त विधान केेले हाेते. जास्तीत जास्त लाेकांनी घराबाहेर पडावे आणि काेराेनाची बाधा हाेण्याची जाेखीम स्वीकारावी, असे मत असलेल्यांच्या गटात पाॅल यांचाही समावेश हाेताे. असे केले तर काेराेनामुळे हाेणारे आर्थिक नुकसान टाळता येईल, असा त्यांचा दावा हाेता.
न्यूयाॅर्क टाइम्सने याबाबत तज्ज्ञांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बाधित हाेणे चांगले की लसीकरण करून घेणे? नेमकी काेणती पद्धती प्रभावी ठरेल, हे सांगता येणार नाही. परंतु लसीकरण करून घेणे सुरक्षित ठरू शकते. बाधित झाल्याने कुणाचे प्राण जातील व कुणाचे वाचतील, हे सांगणे कठीण आहे.
त्याशिवाय प्रत्येक बाधितामध्ये एकसारखी इम्युनिटी विकसित हाेत नसते. वेगवेगळ्या बाधितांमध्ये अँटिबाॅडीच्या संख्येत २०० पट अंतर पाहायला मिळू शकते. गंभीर स्वरूपात आजारी पडणाऱ्या लाेकांमध्ये जास्त राेगप्रतिकारशक्ती तयार हाेते.
एसिम्पटाेमॅटिक किंवा साधारण आजारी लाेकांमधील इम्युनिटी काही महिन्यांत कमकुवत हाेऊ शकते. त्या दृष्टीने लस एक चांगला पर्याय ठरताे.
लसीतून मिळणारी राेगप्रतिकारशक्ती नैसर्गिक इम्युनिटीच्या तुलनेत जास्त बळकट असते. आतापर्यंतच्या तथ्यांचा विचार करता काेविड-१९ च्या बाबतही असेच घडेल, असे म्हणता येईल. माॅडर्नासारख्या लसीच्या परीक्षणात अँटिबाॅडी जास्त कशा बनतात, हे दिसून आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.