आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Corona Vaccine Can Have A Positive Effect On Those Who Exercise Regularly, New Research Shows That Exercise Improves Immunity

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तज्ज्ञांचा दावा:नियमित व्यायाम करणाऱ्यांवर कोरोना लसीचा चांगला परिणाम होऊ शकतो, व्यायामाने रोगप्रतिकारशक्ती चांगली होत असल्याचे नवे संशोधन

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जास्त व्यायामही करू नये, 72 तासांसाठी प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते

जर तुम्ही अॅथलिट असाल तर एखाद्या फ्लूच्या लसीने तुम्हाला चांगली प्रतिकारशक्ती मिळेल. तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती जे लोक अॅक्टिव्ह नसतात त्यांच्या तुलनेत जास्त वाढेल, असा दावा दोन नव्या संशोधनांत करण्यात आला आहे. या संशोधनांत धावपटू, जलतरणपटू, कुस्तीपटू, सायकलपटू, दुसऱ्या खेळाडूंचा समावेश होता. कोरोनाची लस जवळपास तयार असून जगभरात मोठ्या प्रमाणात तिची चाचणी सुरू असताना हे संशोधन महत्त्वाचे मानले जात आहे. हे संशोधन जर्मनीतील सारलँड विद्यापीठाच्या संशोधकांनी केले आहे. हे संशोधन दोन गटांवर करण्यात आले. सारलँड विद्यापीठाच्या इम्युनोलॉजिस्ट आणि या संशोधनाच्या सहलेखिका मार्टिना सेस्टर सांगतात, या संशोधनात खेळाडूंच्या प्रतिकारशक्तीने लस दिल्यानंतर चांगला प्रतिसाद दिला. जे लोक नियमित व्यायाम करतात त्यांच्यावरही कोरोनाची लस चांगला परिणाम करेल, अशी अपेक्षा मार्टिना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आहे. असेच निष्कर्ष असलेले दुसरे संशोधन मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट‌्स अँड एक्सरसाइज जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. यातही लसीच्या चांगल्या परिणामासाठी व्यायाम गरजेचा असल्याचे म्हटले आहे.

एका तासापूर्वी व्यायाम केल्यानेही फायदा

काही लहान संशोधनांत दावा करण्यात आला की, जर हातावर लस टोचण्याच्या एक तास आधी हाताचा व्यायाम केला तर शरीरात चांगला अँटिबाॅडी रिस्पॉन्स मिळतो.

जास्त व्यायामही करू नये, ७२ तासांसाठी प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते

अनेक संशोधनांत म्हटले आहे की, जास्त कठोर व्यायाम केल्याने प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. महामारी तज्ञांचे संशोधन आणि खेळाडूंच्या वैयक्तिक अनुभवातून दिसून आले की, कठोर व्यायाम काही काळासाठी प्रतिकारशक्ती कमकुवत करतो. मात्र, बहुतांश तज्ज्ञांना वाटते की, ते कमी काळासाठी असते. तीन तासांपासून ते ७२ तासांपर्यंत प्रतिकारशक्ती तात्पुरती कमकुवत होऊ शकते, त्यानंतर सामान्य होते.