आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:उणे 80 अंशांत सुरक्षित ठेवावी लागेल कोरोनावरील लस, 600 फ्रीजरमध्ये लस ठेवता येईल असे स्टोअर बनवले जाताहेत

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोविड-19 वरील लस तयार झाल्यानंतरही ती लोकांपर्यंत पोहोचवणे सोपे नाही

डेव्हीस गेल्स
कोविड-१९ ला हरवण्यासाठी जगभरात १७० लसींवर काम सुरू आहे. यापैकी ३० लसी वैद्यकीय चाचण्यांच्या टप्प्यात आहेत. लस उपलब्ध झाल्यानंतरही ती सुरक्षितपणे लोकांपर्यंत पोहोचवणे मोठे आव्हान असेल. यामुळे कोविड-१९ वरील लस उणे ८० अंशांमध्ये ठेवली जाईल. संशोधकांच्या मते, एवढे थंड हवामान केवळ दक्षिण ध्रुवावर आहे. मात्र स्टोअरेज कंपन्यांकडून लस तयार झाल्यानंतर ती लोकांपर्यंत सुरक्षित पोहोचवण्याचे काम सुरू आहे. सध्या अमेरिकेतील औषध निर्माता कंपनी मॉडर्ना आणि फायझर, जर्मन कंपनी बायोएनटेक आणि क्योरवॅक मेसेंजर आरएनए अशा लसींवर काम करत आहे.

दुसरीकडे, अमेरिकी लॉजिस्टिक्स कंपनी यूपीएसने नेदरर्लंडमध्ये फुटबॉल मैदानाएवढी साठवण सुविधा तयार केली आहे. येथे दोन मीटर उंच अनेक फ्रीजर ठेवण्यात आले आहेत. जे उणे ८० अंश तापमान ठेवू शकतात. कोविड-१९ ची लस येथेच ठेवण्यात येईल. येथूनच लोकांपर्यंत लसी पोहोचवल्या जातील. लस पोहोचवण्यासाठी विशेष बाटल्या तयार केल्या जात आहेत. लस पोहोचवण्यासाठी विमान, ट्रक, आणि गोदामांमध्येही डीप फ्रीजर तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

यूपीएस हेल्थकेअरचे प्रमुख अनूक हेसेन सांगतात, जर्मनी आणि अमेरिकेमध्ये युपीएसच्या एअर कार्गोकडे असे सेंटर बनवले जात आहेत. जेथे सुमारे ६०० फ्रीजर ठेवता येथील. अशा एका फ्रीजरमध्ये लसीचे ४८,००० डोस ठेवता येतील. येथे काम करणाऱ्यांसाठी पीपीई किट घालणे अनिवार्य असणार आहे. कर्मचाऱ्यांना ग्लोव्हस, चष्मे तसेच सुरक्षेसाठीचे इतर साहित्य पुरवले जाईल. याशिवाय कोणालाही या वातावरणात राहता येणार नाही.

96 तासांपर्यंत आवरण असलेल्या डब्यांमध्ये बर्फासोबत ठेवतील
अनूक हेसेन सांगतात की, लसीची मागणी झाल्यानंतर त्या आवरण असलेल्या डब्यांमध्ये बर्फासोबत बंद केल्या जातील. या डब्यांमध्ये लस ९६ तासांपर्यंत योग्य तापामानात ठेवता येतील. ज्या खोल्यांमध्ये पॅक केल्या जातील. तेथील तापमान उणे २० अंशांपर्यंत थंड ठेवता येईल. नंतर लस असलेले डबे विमानाद्वारे जगातील कुठल्याही भागात पोहोचवता येतील.

बातम्या आणखी आहेत...