आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Corona Vaccine India World Tracker Update | Corona COVID 19 Vaccine Tracker India Today Latest News: Zydus Cadila ZyCoV D, Oxford AstraZeneca, Bharat Biotech, Russia Sputnik V And Pfyzer| WHO Vaccine Tracker |

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोव्हिड व्हॅक्सीन ट्रॅकर:जाणून घ्या संपूर्ण जग आतुरतेने का पाहत आहे 22 ऑक्टोबरची वाट

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसला आटोक्यात आणण्यासाठी 170 पेक्षा जास्त व्हॅक्सीनवर काम सुरू आहे. डब्ल्यूएचओने सांगितल्यानुसार, सध्या 30 व्हॅक्सीन वेगवेगळ्या ह्युमन ट्रायल्सच्या फेजमध्ये आहेत.

यूएस, यूके, रशिया आणि चीनसह भारतातील दोन व्हॅक्सीन या रेसमध्ये सामील आहेत. सध्या कोरोना व्हॅक्सीन सर्वात वेगाने डेव्हलप होत आहे. यापूर्वी मम्प्सचे व्हॅक्सीन 4 वर्षात तयार झाले होते. आता कोरोना व्हॅक्सीन एका वर्षांच्या आत तयार होऊ शकते. डब्ल्यूएचओनुसार 30 व्हॅक्सीन ह्युमन ट्रायलच्या तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यात आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीपूर्वी व्हॅक्सीन हवीये

अमेरिकेत 3 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीपूर्वी व्हॅक्सीन तयार झालेली हवीये, म्हणजे याचा फायदा त्यांना निवडणुकीत होईल. यासाठी यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (यूएसएफडीए) ने 22 ऑक्टोबरला अॅडवायजरी पॅनलची मीटिंग बोलावली आहे. यात कोव्हिड-19 व्हॅक्सीनच्या प्रगतीवर चर्चा होईल.

बांग्लादेशला हवंय भारतीय व्हॅक्सीनचे ट्रायल

बांग्लादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, आम्ही भारतीय व्हॅक्सीनच्या ह्युमन ट्रायलसाठी तयार आहोत. यापूर्वी बांग्लादेश आणि भारताच्या परराष्ट्र सचिवांची मीटिंगमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी व्हॅक्सीन डेव्हलपमेंट वर चर्चा केली. यानंतर बांगलादेशने म्हटले की, भारत फक्त आपल्यासाठी नाही, तर इतर देशांसाठीही व्हॅक्सीन तयार करणार आहे.

रशियन व्हॅक्सीनमधून म्यूटेशनची चिंता

रशियाने जगातील पहिली कोरोना व्हॅक्सीन "Sputnik-V' लॉन्च केली आहे. पण, दिशा-निर्देशांचे पालन केले नाही. अशात जानकार चिंता व्यक्त करत आहेत की, व्हॅक्सीनमुळे कोरोना व्हायरसचे म्युटेशन होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, आपल्या रचनेत बदल करुन व्हायरस व्हॅक्सीनविरोधात लढू शकतो.