आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना व्हॅक्सीन:रशिया कोरोना लसीच्या पहिल्या खेपेच्या निर्मितीच्या तयारीत, मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटद्वारे तयार केली ही लस

मॉस्कोएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • भारतीय कंपन्या हिरवा झेंडा मिळाल्यानंतर आयात करण्यास इच्छुक : अहवालात दावा

जगातील पहिली कोरोना लस विकसित करण्याचा दावा करणाऱ्या रशियाने पहिल्या खेपेची निर्मिती सुरू केली आहे. रशियाने या लसीचे नाव स्पुटनिक-व्ही ठेवले आहे.

मॉस्कोने १९५७ मध्ये प्रक्षेपित केलेल्या अंतराळ उपग्रहाच्या नावावर हे आधारलेले आहे. दरम्यान, लस संशोधनातील तिसरा टप्पा ७-१० दिवसांत सुरू होऊ शकतो, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. वृत्तसंस्था तासनुसार, मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटद्वारे तयार केलेल्या या लसीच्या चाचणीत हजारो स्वयंसेवक सहभागी होतील. रशियन आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, सोमवारी संशोधन नोंदणीनंतर प्रोटोकॉल जारी करू. गामलेया इन्स्टिट्यूटचे संचालक अलेक्झांडर जिन्स्टबर्ग यांनी सांगितले की, देशहित लक्षात घेता सरकार हा प्रोटोकॉल आठवड्यात जारी करेल.

विश्वासार्हतेवर संशय : डब्लूएचओ, अमेरिकेसह जगाला संशय

रशियाने तयार केलेल्या लसीतून दोन वर्षांपर्यंत सुरक्षा प्रदान करेल, असा दावा केला आहे. मात्र, अमेरिकेसह अनेक देशांचा यावर विश्वास नाही. याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेनेही (हू) रशियाच्या लसीला अद्याप मंजुरी दिली नाही. संघटनेनुसार, रशियाच्या लसीस कठोर चाचणीतून जाण्याची आवश्यकता आहे. हूच्या म्हणण्यानुसार, रशियाने ज्या लसीस परवानगी दिली ती अशा नऊमध्ये समाविष्ट नाही, त्यात ते चाचणीच्या प्रगत टप्प्यांत मानतात.

टोला : रशियात लस तयार, आपले पापडासारखे उपाय : शिवसेना

शिवसेनेने लस निर्मितीबाबत रशियाचे कौतुक करत सरकारला टोला लगावला. शिवसेना नेत संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्रात लिहिले की, “रशिया स्वावलंबनाचा धडा शिकवत आहे, भारत मात्र अद्यापही ‘भाभीजी पापड’सारखे निराळे उत्पादन करण्यात व्यग्र आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी देशातील लोकांचा विश्वास जिंकता यावा यासाठी ही लस कोरोना संसर्गित आपल्या मुलीला दिली. दुसरीकडे, आमचे केंद्र सरकार आहे, त्यांचे मंत्री पापडाचा प्रचार करताना संसर्गित झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...