आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Corona Virus Airborn Virus | World Health Organization (WHO) Coronavirus Transmission Latest News Updates On Airborn Virus

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डब्ल्यूएचओने मान्य केले:कोरोना व्हायरस हवेतून पसरण्याचे पुरावे मिळाले; दोन दिवसांपूर्वी 32 देशांतील 239 संशोधकांनी हाचदावा केला होता

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 32 देशांतील 239 संशोधकांनी दावा केला होता की, व्हायरसचे लहान कण हवेत अनेक तास राहू शकतात

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ने हवेतून कोरोना व्हायरस पसरण्याचे मान्य केले आहे. डब्लूएचओच्या टेक्निकल लीड मारिया वान केरखोव यांनी म्हटले की, आम्ही एअरबोर्न ट्रांसमिशन आणि एअरोसोल ट्रांसमिशनला अमान्य करत नाही. डब्ल्यूएचओने याआधी म्हटले होते की, व्हायरस नाक, तोंडा आणि अनेट पृष्ठ भागांना हात लावल्याने पसरतो.

जिनेवामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत डब्ल्यूएचओच्या अधिकारी बेनेडेटा अल्लेग्रांजीने म्हटले की, कोरोना हवेतून पसरण्याचे पुरावे मिळाले आहेत, पण अंतिम निर्णयावर पोहचण्यासाठी आम्हाला अजून थोडा वेळ लागेल. त्यांनी पुढे म्हटले की, सार्वजनिक ठिकाणांवर हवेतून व्हायरस पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

32 देशातील 239 संशोधकांनी व्हायरस हवेतून पसरण्याचा दावा केला होता

दोन दिवसांपूर्वीच 32 देशातील 239 संशोधकांनी हा व्हायरस हवेतून पसरतो, असा दावा केला होता. त्यांनी डब्ल्यूएचओ आणि सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेंशन (सीडीसी) ला पत्र लिहून यावर विचार करण्याचा आणि दिशा-निर्देशांमध्ये बदल करण्यास सांगितले होते.   या संशोधकांनी आपल्या रिसर्चच्या हवाल्याने सांगितले होते की, नोव्हल कोरोना व्हायरस म्हणजेच, Sars COV-2 चे लहान कण हवेत अनेक तास राहू शकतात आणि यादरम्यान कोणी संपर्कात आल्यास त्यांना संक्रमित करतात.

बातम्या आणखी आहेत...