आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Corona virus causes 46 crore deaf and dumb people in the world problems of blind people mask disturbance

दिव्य मराठी विशेष :कोरोना विषाणुमुळे वाढल्या जगातील ४६ कोटी मूकबधिर, अंध व्यक्तींच्या अडचणी, मास्क-डिस्टन्सिंगचा अडथळा

डेरिक ब्रायसन टेलरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंध व्यक्ती स्पर्शाने, तर मूकबधिर ओठांच्या हालचालीने समजून घेतात भावना

जगभरात सुमारे ६७ लाखांहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर, यामुळे ३.९० लाखांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे कोरोनामुळे सामान्य माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असताना दुसरीकडे सर्वात जास्त अडचणी इतरांवर अवलंबून असणाऱ्या लोकांसमोर निर्माण झाल्या आहेत. यात दिव्यांग व्यक्तींचा समावेश आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगसारख्या अनिवार्य उपायांमुळे ते जगापासून दूर झाले आहेत. कारण अंध व्यक्तींना स्पर्शाने अनेक गोष्टींची ओळख होत असते. याद्वारे ते आपल्या भावना व्यक्त करू शकतात. तर, दुसरीकडे मूकबधिर ओठांच्या हालचालीने संवाद साधत असतात आणि स्वत:ला व्यक्त करतात. मात्र, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि इतर उपायांमुळे जगभरात अशा ४६ कोटी लोकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. यात अनेकांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. अमेरिकेत अशा लोकांची संख्या ३.७ कोटी आहे.

कॅलिफोर्नियातील कॉम्पटनमध्ये राहणाऱ्या एश्लिया हेज यापैकीच एक आहेत. त्या साधारपणे लहान-मोठी कामे स्वत:च करतात. मात्र, सध्या त्या पूर्णपणे डिलिव्हरी सेवेवर अवलंबून आहेत. त्या सांगतात, सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. यामुळे माझी चिंता वाढली आहे. हे सुरक्षा उपायांमुळे झाले आहे. महामारीने आमचे आयुष्य बदलून टाकले आहे. दिव्यांगांसाठी फिजिकल डिस्टन्सिंगसारखे दिशानिर्देश आता आव्हान म्हणून समोर उभे राहिले आहे.

भारतात २ कोटींपेक्षा जास्त आहेत अंध, मूकबधिर व्यक्तींची संख्या

भारतात २ कोटींपेक्षा जास्त लोक अंध आणि मूकबधिर आहेत. २०१९ मधील एका सर्वेक्षणानुसार, देशात सुमारे १.८ कोटी लोक अंध आहेत. तर, ४२ लाखांपेक्षा जास्त जण मूकबधिर आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार, दिव्यांगांच्या उपचारावर आणि देखभालीवर वर्षाला ५.६२ लाख कोटी रुपये खर्च होतात.

0