• Home
  • International
  • Corona Virus : London, Madrid Coron's New Center; The number of deaths doubles every day

कोरोना व्हायरस : लंडन, माद्रिद काेराेनाचे नवे केंद्र; दर दाेन दिवसांत मृतांची संख्या दुप्पट, दुर्बल व वृद्धांना वाऱ्यावर सोडताहेत डॉक्टर

  • इटलीत रस्त्यावर भटकंती करणाऱ्यांना अडीच लाखांचा दंड लागणार, स्पेनमध्ये ३ हजार ४३४ जणांचा मृत्यू, चीननंतर दुसऱ्या स्थानी
  • इटलीच्या लाेम्बार्डीने चीनच्या वुहानची घेतली हाेती जागा

प्रतिनिधी

Mar 26,2020 11:19:31 AM IST

लंडन / माद्रिद : स्पेनमधील माद्रिद व ब्रिटनमधील लंडन काेराेना विषाणूचे नवे केंद्र बनले आहे. येथे दर दाेन दिवसांत मृतांची संख्या दुप्पट झाली आहे. आतापर्यंत इटलीचे लाेम्बार्डी शहर काेराेना विषाणूचे केंद्र बनले हाेते. मृत संख्येच्या नव्या विश्लेषणानुसार काही शहरांतील मृतांची संख्या सरासरी मृत्यूंहून जास्त झाली आहे. फायनान्शियल टाइम्सच्या अभ्यासानुसार लंडनमध्ये दर दाेन दिवसांनी मृतांचा आकडा दुप्पट झाला आहे. ही संख्या ब्रिटनमधील इतर शहरांतील मृतांच्या तुलनेत जास्त आहे. जगभरातील सुमारे ४.१५ लाख लाेक या आजाराने ग्रस्त आहेत. १८ हजार लाेकांचा मृत्यू झाला आहे. इटलीत साेमवारी ७४३ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे काेराेनाच्या मृतांची संख्या ६ हजार ८२० वर पाेहाेचली आहे. इटली सरकारच्या म्हणण्यानुसार कडक निर्बंध असूनही दरदिवशी बाधित लाेकांचे प्रमाण ८ टक्क्यांवर आले आहे. येथे २१ फेब्रुवारीनंतर ही संख्या कमी आहे. ब्रिटनमध्ये मृतांची संख्या ६ पेक्षा जास्त आहे. मंगळवारी एकूण मृतांची संख्या ७१ हाेती. स्पेनच्या माद्रिदमध्ये १२ हजार ३५२ जण बाधित सापडले आहेत. तर १५३५ जणांचा मृत्यू झाला. देशातील एकूण मृतांच्या संख्येच्या तुलनेत ५७ टक्के आहे. युराेपच्या बाहेर अमेरिकेत मृतांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. न्यूयाॅर्कमध्ये १२ हजार लाेकांना संसर्ग झाला. १२५ लाेकांचा मृत्यू झाला.


स्टेडियम रुग्णालयात रूपांतरित


अमेरिकेत न्यूयाॅर्कला काेराेनाचा सर्वाधिक फटका बसला. येथे आतापर्यंत २० हजाराहून जास्त प्रकरणे समाेर आली आहेत. १६० जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात डाॅक्टर व व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे न्यूयाॅर्क युनिव्हर्सिटी मेडिकल काॅलेज व हाॅस्पीटल आपल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करणार आहे. त्यानंतर हे विद्यार्थी काेराेनाविरूद्धच्या लढाईत सक्रिय हाेतील. येथील एका स्टेडियमला १ हजार खाटांच्या रुग्णालयात परिवर्तीत करण्याचे काम सुरू आहे. त्याशिवाय न्यूयाॅर्कमध्ये गर्दी असलेल्या तुरुंगातून ३०० जणांची सुटका केली जाणार आहे.


ब्रिटन : दुर्बल व वृद्धांना वाऱ्यावर सोडताहेत डॉक्टर


कॅम्ब्रिज विद्यापीठानुसार लंडनमध्ये चर दिवसात आयसीयू पूर्णपणे भरतील. संपूर्ण इंग्ल्डंमध्ये ही स्थिती पुढील १४ दिवसात येऊ शकते. डेली टेलिग्राफने हॅरोमधील नार्थविक पार्क रुग्णालयाच्या एका नर्सच्या हवाल्याने लिहिले अाहे की, त्यांना निर्देश देण्यात आले आहेत की गंभीर रुग्णांना मरण्यासाठी सोडून द्या. इटलीप्रमाणेच अशा लोकांचे व्हेंटिलेटर काढून घ्यावेत म्हणजे जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवता येतील. आमचे प्राधान्य तरुणांना वाचवायला आहे, ज्यांना श्वास घेण्यात त्रास असेल आणि व्हेंटिलेटरची गरज आहे. या नर्सने सांगितले की, आमच्याकडे पुरेशी साधने राहिलेली नाहीत. रुग्णालयाच्या बाहेर लोकांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कारमध्ये वॉर्ड बनवले अाहेत.


हुबेईत रेल्वेस्थानकावर जनजीवन पूर्ववत


वुहान : चीनच्या हुबेई प्रांतात बुधवारी जनजीवन पूर्ववत झाले आहे. या प्रांतात ६ काेटी लाेक घरात कैद हाेते. लाॅकडाऊन मागे घेण्यात आल्यानंतर हुबेईमध्ये रेल्वे, विमानतळ व बसमध्ये झुंबड पाहायला मिळाली. माचेंग शहरातील रेल्वेच्या दरवाजांवर प्रवाशांची लांबच लांब रांग हाेती. त्यात अनेक मास्क लावलेली मुलेही हाेती. सुरक्षा रक्षक गर्दीला िनयंत्रित करत हाेते. या बागात अडकलेले हुबेईचे लाेकही घरी परतण्याची तयारी करत आहेत. बीजिंगमध्ये अडकलेल्या एक महिला शिक्षिका म्हणाल्या, माचेंगला जाण्याचे तिकीट बुक केले आहे. वाहतूक पाेलिस अधिकारी म्हणाले, सुमारे दाेन हजार लाेक एका दिवसात रस्तेमार्गे माचेंगला परतले. काेराेनाचे केंद्र राहिलेेले वुहानमध्ये शहर बस सुरू झाली आहे. बससाठी काही ठिकाणी लांबच लांब रांगा दिसून आल्या.


इटली : वेसण घातल्याने बाधितांचे प्रमाण ८ टक्के

मिलान : इटलीत ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन आहे. गेल्या आठवड्यात एक नियम तोडणाऱ्यांची संख्या बघून दंडाच्या रकमेत २५ पटीने वाढ करण्यात आली आहे. आता लॉकडाऊन नियमाचा भंग केल्यास १७ हजाराऐवजी २.५ लाख रुपये दंड लागेल. लोकांना रोखण्यासाठी रस्त्यावर सैन्य तैनात करण्यात आले आहे. त्याचा परिणाम दिसून येत आहे. संसर्ग वाढण्याचे प्रमाण ८ टक्क्यावर आले आहे. २१ फेब्रुवारीनंतर हा दर कमी आहे. पंतप्रधान जिजेज्पी काैंटे यांनी ही घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या नियमांना आणखी कडक करण्यात आले आहे. लोक आता घराजवळ २०० मीटर क्षेत्रात पाळीवर कुत्र्यस फिरायला नेऊ शकत नाहीत. इटलीच्या मिलानमध्ये ऑनलाईन स्टोरमध्ये २१ दिवसांची प्रतीक्षा येत आहे. सुपरमार्केटमधून साध्या खरेदीला ६-७ तास लागू लागलेत. बाल्कनी, खिडक्यांवर उभे राहून लोक परस्परांना हिंमत देत आहेत. इटलीच्या एकतेची गीत गायले जात आहेत. बहुतांशवेळा इटलीच्या राष्ट्रगीताचे गायन केले जात आहे. उत्तर ते दक्षिणेपर्यंत लोक आपल्या घरांच्या खिडक्यांवर इटलीचे ध्वज लावू लागले आहेत. येथील उद्योगपती व उद्योग क्षेत्रातील लोक रुग्णालयांना भरभरून दान करू लागले आहेत.

X