आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Corona Virus Outbreak In World Latest News And Updates : The Second Wave Of Corona Is Less Likely To Be Fatal; Patients Began To Grow In The New Wave ... But A Significant Reduction In Mortality

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युरोपात कोरोनाची दुसरी लाट:कोरोनाची दुसरी लाट कमी घातक ठरण्याची शक्यता; नव्या लाटेत रुग्ण वाढू लागले... मात्र मृत्युदरात लक्षणीय घट

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या वेळी विषाणू प्रामुख्याने तरुण व निरोगी लोकांना लक्ष्य करत आहे

युरोप उपखंडात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. ब्रिटन, फ्रान्ससारख्या देशांत पुन्हा लॉकडाऊनची तयारी सुरू आहे. दुसऱ्या लाटेत पूर्वीपेक्षा रुग्णसंख्या अधिक असली तरी दिलासा हा की मृत्यू कमी होत आहेत. त्यामुळे कोरोना घातक नाही अशी मानसिकता होत आहे. या वेळी विषाणू प्रामुख्याने तरुण व निरोगी लोकांना लक्ष्य करत आहे.

स्पेन : रुग्णांच्या तुलनेत मृत्यू कमी

एप्रिलमध्ये रोज ९ हजार रुग्ण होते, मृत्यू होते ९२९. आता रोज कमाल १५ हजार रुग्ण असले तरी मृत्यू कमी आहेत. १६ सप्टेंबरला सर्वाधिक २४० मृत्यू झाले होते.

फ्रान्स : मृत्यूचा पीक होऊन गेला

शनिवारी नवे १३,४९८ रुग्ण आढळले. मात्र, मृत्यू केवळ १५४ होते. एप्रिल मध्यात रोज सरासरी ७,५७८ रुग्ण आढळत होते तेव्हा रोज १,४३७ मृत्यू होत होते.

स्वीडन : जुलैतच पीक येऊन गेला

जूनमध्ये १६९८ रुग्ण असताना पीक होता. तेव्हा मृत्यूसंख्या ११५ होती. दुसऱ्या लाटेत रोज ३०० रुग्ण, परंतू मृत्यू एक-दोन होतात. काही मृत्यूंची ही संख्या शून्यावर.

ब्रिटनमध्ये विलगीकरण मोडले तर दंड

> अनेक देशांत चाचण्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे कारण समोर येत आहे.

> ब्रिटनमध्ये घरातील विलगीकरणाचा नियम मोडला तर ९.५ लाख दंड, तर संबंधित व्यक्ती गरीब असेल तर सरकार ५० हजारांची मदत देईल.

बातम्या आणखी आहेत...