आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत अमेरिकेतील स्थिती गंभीर होत चालली आहे. गेल्या दोन आठवड्यांत अमेरिकेत कोरोनाच्या नव्या रुग्णांचे प्रमाण ८० टक्क्यांनी वाढले आहे. शनिवारी अमेरिकेत १ लाख ५९ हजार २१ रुग्ण आढळून आले आहेत. नव्या मृत्यूची संख्या १२१० एवढी राहिली. एका आठवड्यात नवीन रुग्णांची सरासरी संख्या १ लाख ४५ हजार ७१२ होती. त्याआधीच्या दोन आठवड्यांपूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण ८० टक्क्यांनी जास्त आहे. रविवारी सकाळपर्यंत अमेरिकेत आतापर्यंतचे एकूण १,०९,७७,६०० लोक बाधित झाले आहेत. २ लाख ४५ हजार ४०० जणांना प्राण गमवावे लागले आहेत. अमेरिकेच्या जवळपास सर्व राज्यांत नव्या पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत चालली आहे. अनेक रुग्णालयांत खाटा फुल्ल आहेत. रुग्णसंख्येच्या तुलनेत आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवतोय. थंडीचा वाढता कडाका पाहून शिकागो, सेंट लुइसच्या गव्हर्नरनी शहरांत अनेक प्रकारचे निर्बंध पुन्हा लागू केले आहेत. अमेरिकेच्या बहुतांश राज्यांत नव्या रुग्णांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे. नव्या मृत्युसंख्येतही वाढत होत आहे. मात्र, एप्रिलच्या तुलनेत हे प्रमाण अजून कमी आहे.
२०२१ च्या थंडीपर्यंत स्थिती सामान्य :
लस निर्माताकोरोनाकाळानंतर संपूर्ण जग सामान्य स्थितीत येण्यास २०२१ च्या थंडीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. फाइजर कंपनीच्या कोरोना लसीचे सहनिर्माता प्रोफेसर युगुर साहिन यांनी हा दावा केला आहे. बायोएनटेकचे संशोधन साहिन म्हणाले, यंदाची थंडी अतिशय त्रासदायक असू शकते. पुढील एप्रिलपर्यंत ३० कोटी लसींचे वितरण करण्याची योजना होती. अमेरिकेत लवकरात लवकर लस तयार होईल, असे सुरूवातीला सांगण्यात येते होते.
अमेरिकेत लस वितरणासाठी पायाभूत गोष्टींची कमतरता
अमेरिकेत आणीबाणीत वापरासाठी कोरोना लस पुढील महिन्यात उपलब्ध होईल. परंतु संपूर्ण देशात लसीकरणासाठी पुरेशा प्रमाणात पायाभूत व्यवस्था सज्ज नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्रम्प प्रशासनाने लस विकसित करण्यासाठी फार्मा कंपन्यांना कोट्यवधी डॉलर दिले. मात्र, लसीकरण सुलभ व्हावे यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा व इतर गोष्टींचा पुरवठा केलेला नाही. आरोग्य विभागाने लसीकरण मोहिमेसाठी ८४० कोटी डॉलरची तत्काळ तरतूद करण्याची मागणी केली आहे. वास्तविक ट्रम्प यांनी सुरूवातीपासूनच कोरोनाबाबत निष्काळजीपणा दाखवला होता. त्यामुळे पायाभूत व्यवस्थेकडे त्यांनी दुर्लक्ष केले .
युरोपात एका दिवसात ३७६४ मृत्यू
युरोपात कोरोनाची दुसरी लाट धोकादायक रूप घेताना दिसते. शनिवारी येथे ३ हजार ७६४ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. शनिवारी संपूर्ण युरोपात २ लाख ४२ हजार ७७७ नवे रुग्ण आढळले. पाेलंडमध्ये सर्वाधिक ५४८ जणांचा मृत्यू झाला. इटलीत ५४४ जण दगावले. ऑस्ट्रेलियाने लॉकडाऊन लागू करण्याचे ठरवले. ब्रिटनच्या अनेक प्रांतांत आधीपासून लॉकडाऊन सुरू आहे. ऑस्ट्रेलियात शाळा, दुकाने दाेन आठवडे बंद असतील. ऑस्ट्रियात शनिवारी ७ हजारांहून जास्त रुग्ण आढळून आले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.