आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय संशोधकांच्या नेतृत्वातील टीमला कोरोना चाचण्यांसाठी स्वस्त आणि विजेची गरज नसलेले डिवाइस 'हँडीफ्यूज' बनवण्यात यश मिळाले आहे. याच्या माध्यमातून रुग्णाच्या सलाइवाच्या घटकांना वेगळं करुन, कोरोना व्हायरसची चाचणी करता येते. यामुळे मागास भागातील लोकांची चाचणी करण्यास मदत मिळेल.
विजेशिवाय चालेल 'हँडीफ्यूज' डिवाइस
अमेरिकेतील स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ज्ञ मनु प्रकाशसह इतर संशोधकांनी सांगितल्यानुसार, 'हँडीफ्यूज' डिवाइस ट्यूबमध्ये रुग्णाच्या सलाइवाला वेगाने फिरवले जाते, यामुळे लाळेतून व्हायरसचे जिनोम वेगळे होतात. या प्रोसेससाठी विजेची गरज नाही. हा एकप्रकारचा स्वस्त सेंट्रीफ्यूज डिवाइस आहे, याला बनवण्यासाठी पाच यूएस डॉलरपेक्षाही कमी पैसे लागतात. याच्या माध्यमातून कमी वेळात आणि योग्य तंत्रज्ञानातून कोरोनाची चाचणी होऊ शकते.
एका तासात येईल रिपोर्ट
संशोधकांनी सांगितल्यानुसार, या डिवाइसद्वारे कोणत्याही इतर उपकरनाशिवाय एका तासापेक्षा कमी वेळेत कोरोना रुग्णाची रिपोर्ट मिळू शकेल. प्रत्येक चाचणीला एका डॉलरपेक्षाही कमी खर्च येईल. परंतू, व्हायरसच्या जीनोममधील विविधतेच्या आधारे रिपोर्टवर परिणाम पडू शकतो. याचे कारण लाळेतील विविध घटक असू शकतात.
इतर सेंट्रीफ्यूजमध्ये येतो शेकडो डॉलर्सचा खर्च
संशोधकांनुसार, इतर सेंट्रीफ्यूज एक मिनीटात 2000 वेळा रोटेट होतो. यात शेकडो डॉलर्सचा खर्च होतो आणि यासाठी विजेची गरत असते. परंतू, 'हँडीफ्यूज'मध्ये असे नाही. ही अतिशय स्वस्त प्रोसेस आहे.
कोरोना संक्रमितांच्या नमुन्यावर प्रयोक करणे बाकी
संशोधकांनी आपल्या अभ्यासात लिहीले आहे की, डिवाइसचा प्रभाव मोजण्यासाठी कोरोना संक्रमितांच्या नमुन्याची चाचणी करणे बाकी आहे. यानंतरच याच्या मान्यतेवर आम्ही विचार करू. पुढे सांगितले की, आम्हीदेखील एलएएमपी प्रोटोकॉल आणि हॅडीफ्यूजला फील्ड सेटिंगमध्ये टेस्ट करण्याची तयारी करत आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.