आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरात कोरोनाचा धोका:चीनमध्ये 22 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; चिनी नागरिकाच्या आत्महत्येचा व्हायरल VIDEO

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चीनमधील एक व्यक्ती आत्महत्या करताना दिसत आहे.

कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. दरम्यान, चिनी कम्युनिस्ट पक्षावर लक्ष ठेवणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग यांनी सोशल मीडियावर हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक व्यक्ती इमारतीच्या छतावरून आत्महत्या करताना दिसत आहे. चीनमध्ये कोरोनामुळे लोक आत्महत्या करत असल्याचा झेंगचा दावा आहे.

चीनमधील 22 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

तामिळनाडू येथील अब्दुल शेख हा चीनमध्ये मेडिकल शीक्षण घेत होता.
तामिळनाडू येथील अब्दुल शेख हा चीनमध्ये मेडिकल शीक्षण घेत होता.

तामिळनाडू येथील अब्दुल शेख या मेडिकल विद्यार्थ्याचा चीनमध्ये मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारण काही आजार असल्याचे सांगितले जात असले तरी या आजाराचे नाव स्पष्टपणे घेतलेले नाही. अब्दुलचा मृतदेह परत आणण्यासाठी कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे मदत मागितली आहे.

अब्दुल गेल्या पाच वर्षांपासून चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. तो 11 डिसेंबर रोजी भारतात आला होता. परंतु इंटर्नशिपसाठी चीनमधील क्विहार येथे पुन्हा परतला होता. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार अब्दुलने तेथे 8 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला होता. आजारी पडल्यानंतर अब्दुल शेख याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले, मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही.

ऑस्ट्रेलिया, कॅनडाने चीनमधील प्रवाशांवर लावले निर्बंध

ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर कोरोनाची खबरदारी म्हणून काही निर्बंध लादले आहेत. याअंतर्गत प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. पब्लिक हेल्थ एजन्सी ऑफ कॅनडाच्या (PHAC) मते, चीन आणि हाँगकाँगमधून येणाऱ्या प्रवाशांना कोविड-19 चे नेगिटिव्ह अहवाल दाखवणे बंधनकारक केले आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा वाढता धोका पाहून अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी अनिवार्य केली आहे. आता निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे बंधनकारक केले आहे.

हाँगकाँग चीनची सीमा उघडू शकते
हाँगकाँग 8 जानेवारीपासून चीनसोबतची सीमा उघडणार आहे. यासोबतच प्रवाशांसाठी अनिवार्य क्वारंटाईनही रद्द करण्यात येणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात कोटा निश्चित करण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या अंतर्गत कोणाला प्रवास करता येईल हे ठरवले जाईल. त्यानंतर सीमा पूर्णपणे खुली केली जाईल.

जगात 66 कोटी 49 लाखांहून अधिक प्रकरणे

कोरोना वर्ल्डोमीटरनुसार, जगात आतापर्यंत 66 कोटी 49 लाख 95 हजार 403 रुग्ण आढळले आहेत. 11 जानेवारी 2020 रोजी चीनमधील वुहान येथे एका 61 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. कोविडमुळे जगातील हा पहिला मृत्यू होता. यानंतर मृत्यूची प्रक्रिया वाढू लागली. आतापर्यंत 66 लाख 97 हजार 402 मृत्यू झाले आहेत.
मोरोक्को: चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी
मोरोक्कोने 3 जानेवारीपासून चीनमधून येणाऱ्या लोकांवर बंदी घातली आहे. ते कोणत्याही देशाचे असू शकतात. रविवारी कॅनडाने चीनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचणी आवश्यक केली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, ब्रिटन, स्पेन, अमेरिका, तैवान, जपान, भारत, इटली, दक्षिण कोरिया आणि पाकिस्ताननेही या लोकांसाठी चाचणी अनिवार्य केली आहे.

चिनी जनता नवीन वर्षात संसर्गाचा धोका विसरली
कोरोनाग्रस्त चीनमध्येही लोकांनी नवीन वर्ष उत्साहात साजरे केले. बीजिंग आणि वुहानमध्ये मध्यरात्री लाखो लोकांची गर्दी जमली. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशवासियांना सांगितले - चीनमधील कोरोनाविरुद्धच्या लढाईने नव्या टप्प्यात प्रवेश केला आहे. मोठ्या आव्हानांसोबतच आपल्यासमोर आशेचा किरणही आहे. एकत्रितपणे, आपण या संकटातून अधिक ताकदीने बाहेर पडू.

कोरोना धोक्याचा काळ असून देखील चीनच्या वुहानमध्ये नववर्षानिमित्त लाखो लोकांची गर्दी जमली होती.
कोरोना धोक्याचा काळ असून देखील चीनच्या वुहानमध्ये नववर्षानिमित्त लाखो लोकांची गर्दी जमली होती.

यासंबंधित अन्य बातम्या वाचा

जगभरात कोरोनाचा धोका:नववर्षाच्या स्वागतात चीनी विसरले संसर्गाचा धोका; जल्लोषासाठी जागोजागी नागरिकांची गर्दी

आज संपूर्ण जग नवीन वर्षांचे स्वागत करत आहे. यात कोरोनाग्रस्त चीनमध्येही लोकांनी नववर्षाचे जंगी स्वागत केले आहे. कोरोना संसर्गाचा धोक्याला नाकारून लोक नववर्ष साजरे करण्यासाठी जागोजागी जमले होते. त्यामुळे बीजिंग आणि वुहानमध्ये मध्यरात्री लाखो लोकांची रस्त्यावर गर्दी पाहायला मिळाली आहे. याचे अनेक व्हिडिओ व फोटो सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाले. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नववर्षाचे जगभरात जंगी स्वागत:म्यानमारने 4 तासांसाठी कर्फ्यू हटवला; रशियन अंतराळवीरांनी अवकाशात उत्सव साजरा केला

संपूर्ण जगभरात नवीन वर्षाचे स्वागत केले जात आहे. लष्करशासित असलेल्या म्यानमारमध्येही 2023 चे स्वागत करण्यासाठी 4 तासांसाठी कर्फ्यू हटवण्यात आला. लष्करातील लीक झालेले पत्र सद्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले असून ज्यामध्ये असे लिहिले आहे की, लोक नवीन वर्ष साजरे करू शकतील. यासाठी चार तासांचे निर्बंध हटविण्याचे सांगण्यात आलेले आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बातम्या आणखी आहेत...