आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Corona Virus Update | Scientists Find New Mutation Of Coronavirus That Mirrors A Change In The 2003 SARS Virus That Showed The Disease Was Weakening|

आशेचा किरण:कमकुवत होत आहे कोरोनाव्हायरस, शास्त्रज्ञांना सापडला असा म्यूटेशन जो 17 वर्षांपूर्वी सार्स व्हायरसच्या वेळी सापडला होता

अॅरिझोना3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत जगभरात कोरोनव्हायरसमध्ये 33 पेक्षा जास्त म्यूटेशन अर्थान परिवर्तन शोधले आहेत
  • अमेरिकन रुग्णाच्या सँपलमध्ये सापडला नवा म्यूटेशन, पहिल्यांदा व्हायरसला कमकुवत दाखवतो

कोरोनामुळे पीडित जगासाठी एक आशेचा किरण या विषाणूपासून समोर आला आहे. अमेरिकेच्या अॅरिझोनामधील शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या SARS-CoV-2 विषाणूमध्ये अशी अनोखी परिवर्तन आणि अनुवंशिक पॅटर्न शोधला आहे, जो 17 वर्षांपूर्वी सार्स विषाणूच्या संसर्गाच्या वेळी आढळली होती. हे म्यूटेशन व्हायरस प्रोटीनच्या मोठ्या भागाला म्हणजेच याची जेनेटिक मटेरियलचे आपणहून गायब होणे आहे. 

शास्त्रज्ञ यामुळे उत्साहित आहेत कारण सार्स व्हायरसमध्ये जेव्हा हे गायब होणारा पॅटर्न दिसला होता तेव्हा त्याच्या पाच महिन्यांत सार्सचा संसर्ग नाहीसा झाला होता. म्हणूनच शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की या कोरोना विषाणूचे हे संकेत त्याच्या कमकुवतपणास कारणीभूत ठरू शकतात. 

म्यूटेशन म्हणजे काय?

एखाद्या स्थानामुळे किंवा वातावरणामुळे किंवा इतर कारणांमुळे विषाणूच्या अनुवांशिक संरचनेत उद्भवणाऱ्या बदलाला म्यूटेशन म्हणतात. संशोधनादरम्यान, संशोधक गणिती नेटवर्क अल्गोरिदमच्या मदतीने व्हायरसच्या संरचनेचा अभ्यास करतात. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे तज्ज्ञ डॉ. सी.एच. मोहन राव म्हणतात की भारतात कोरोनाव्हायरस सिंगल म्यूटेशनमध्ये आहे. याचा अर्थ असा आहे की हे लवकरच संपेल. परंतु जर व्हायरस वारंवार बदलत गेला तर धोका वाढेल आणि लस तयार करण्यात अडचण येईल.

7 पॉईंटमध्ये समजून घ्या संपूर्ण संशोधन

1. हे नवीन म्यूटेशन चांगले आहे: व्हायरसमधील काही म्यूटेशन मानवाच्या विरूद्ध तर काही फायदेशीर असतात. अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचे म्हणणे आहे की आम्ही शोधलेले म्यूटेशन मानवी हिताचे एक अद्वितीय बदल म्हटले जाऊ शकते.

2. जेनेटिक लेटर्सचे गणित : शास्त्रज्ञांनी नाकातील स्वॅबच्या 382 नमुन्यांमध्ये मिळालेल्या व्हायरसच्या जीनोमला एका क्रमाने जोडून आपला प्रयोग केला. याला जनुक अनुक्रमण म्हणतात. मानवांप्रमाणे, विषाणूंच्या अनुवांशिक सामग्रीमध्ये अक्षरे नावाच्या सर्वात लहान रासायनिक युनिट्स असतात.

3. एका कोरोना व्हायरसमध्ये 30 RNA लेटर्स असतात : माणसांमध्ये मुख्य जेनेटिक मटेरिअन आपला DNA असतो आणि शरीरात सुमारे 3 अब्ज DNA लेटर्स असतात. अशाचप्रकारे कोरोना व्हायरसचे जेनेटिक मटेरिअल RNA प्रोटीन असतो आणि एका व्हायरसमध्ये सुमारे 30 हजार RNA लेटर्स असतात. 

4. 382 नमुन्यांपैकी एक अनोखा : अॅरिझोना विद्यापीठाच्या वैज्ञानिक जेव्हा 382 नमुन्यांचा अभ्यास करत होते तेव्हा एका व्हायरस नमुन्यात त्यांना 81 लेटर्स गायब झालेले आढळले. या संशोधनाचे प्रमुख डॉ. इफ्रेम लिम म्हणाले की, आम्ही 17 वर्षांपूर्वी 2003 मध्ये सार्स विषाणूच्या संसर्गाच्या वेळी असेच काही पाहिले होते.  त्यावेळीसुद्धा, जेव्हा व्हायरस कमकुवत होत होता, तेव्हा त्याच्या प्रोटीन संरचनेचा मोठा भाग अदृश्य होत होता. 

5. कमकुवत व्हायरस लससाठी चांगला : संशोधक डॉ. लिम म्हणतात की कोरोनाव्हायरसचे हे कमकुवत रूप चांगले आहे कारण यामुळे वेळोवेळी व्हायरसची क्षमता कमी होत असल्याचे माहित होते. कमकुवत व्हायरस देखील लस उत्पादनाच्या दिशेने खूप उपयुक्त ठरू शकतात. सध्या ऑक्सफोर्डमध्ये तयार होणारी कोरोना लससाठी कमकुवत चिंपांझीच्या विषाणूचा वापर होत आहे. 

6. सार्स सारखा कोरोना : 17 वर्षांपूर्वी फेब्रुवारी 2003 ते जुलै 2003 दरम्यान सार्स विषाणूच्या संसर्गा दरम्यान त्याच्या विषाणूमध्येही असेच म्यूटेशन दिसून आले होते. त्या काळात हा रोग अचानक आशियात पसरला आणि त्यानंतर पाच महिन्यांत त्याचा प्रभाव कमी झाला. यानंतर, हळूहळू प्रकरणे कमी झाली आणि म्यूटेशनमुळे व्हायरस कमकुवत झाल्याचे मानले गेले. कोरोनाबाबतही हाच आशेचा पहिला किरण दिसतो आहे. कारण हा व्हायरस सार्सच्या व्हायरसशी बऱ्यापैकी मिळताजुळता आहे. यामुळेच याचे नाव SARS-CoV-2 आहे. 

7. हे पुढीलसाठी चांगले संकेत: व्हायरसच्या कमकुवतपणामुळे हे देखील समजते की, ते एक रोगप्रतिकारक प्रोटीन आहे, याचा अर्थ असा की तो रुग्णाच्या अँटीव्हायरल प्रतिसादासाठी संघर्ष करतो. आणि आता SARS-CoV-2 च्या एका नमुन्याने असा प्रतिकार केला आहे. यावरून हा व्हायरस कमकुवत आणि कमी संक्रमित होऊ शकतो असे समजले जाऊ शकते. 

बातम्या आणखी आहेत...