आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Corona Virus Updates: Corona Virus Found In China Claims In US Confidential Report; News And Live Updates

अमेरिकेच्या गोपनीय अहवालात दावा:कोरोना फैलावाच्या महिनाभर आधीच वुहान लॅबच्या तीन संशोधकांमध्ये आढळली होती लक्षणे!

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिला रुग्ण डिसेंबर 2019 मध्ये आढळल्याचे चीनने सांगितले होते, ते खोटे होते

जगाला जेव्हा ‘कोरोना’ माहीतही नव्हता, त्याच्या एक महिना आधी चीनच्या वुहान लॅबचे तीन संशोधक आजारी पडले होते. त्यांना रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते. अमेरिकेच्या एका गोपनीय अहवालात ठोस पुराव्यांच्या आधारावर हा दावा करण्यात आला आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या तीन संशोधकांना नोव्हेंबर २०१९ मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार, आजारी संशोधकांची संख्या, आजारी पडण्याची व रुग्णालयात नेण्याची वेळ आणि कोरोनासारखी लक्षणे आढळल्याशी संबंधित विस्तृत माहिती अहवालात आहे. चीनने मात्र कोरोनाचा पहिला रुग्ण ८ डिसेंबर २०१९ ला आढळला होता, असे डब्ल्यूएचओला सांगितले होते. कोरोना विषाणूवर काम करणाऱ्या टीममधील संशोधक एकाच वेळी आजारी पडले. सामान्य फ्लू, सर्दी व खोकला होता तर त्यांना थेट रुग्णालयात का दाखल करण्यात आले, असा प्रश्न अहवालात उपस्थित करण्यात आला आहे.

त्याशिवाय त्यांना तज्ज्ञांच्या निगराणीत ठेवण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे सर्वांमध्ये एकसारखी लक्षणे आढळली. लॅबच्या अत्यंत सुरक्षित वातावरणात तीन जण आजारी पडले आणि आठवडाभरात गंभीर अवस्थेत पोहोचले यावरूनही कोरोनाच्या उत्पत्तीशी संबंधित अमेरिकी कृती दलाचे माजी अधिकारी डेव्हिड अशर यांनी संशय व्यक्त केला होता.

७६ हजार बाधित, ९२ चा डेटा असल्याचे सांगितले
डब्ल्यूएचओच्या तपास चमूनुसार, त्यांनी चीनकडे कोरोना बाधित लोकांचा डेटा मागवला होता, तेव्हा ९२ संभाव्य रुग्णांची ओळख पटल्याचे सांगण्यात आले. तथापि, तेथे आॅक्टोबर ते डिसेंबर २०१९ च्या दरम्यान ७६ हजार लोक बाधित होते. चमूने डिसेंबर २०१९ च्या आधी अँटिबॉडीच्या चाचणी नमुन्यांसाठी स्थानिक ब्लड बँकेचा डाटाही मागितला होता. पण तो अद्यापही दिलेला नाही. त्यावरून चीन बरेच लपवत आहे, हे स्पष्ट आहे.

विषाणू चीनच्या लॅबमधूनच बाहेर पडला हे सर्व तथ्यांवरून सिद्ध होते
अलीकडेच अमेरिकेच्या १८ वैज्ञानिकांच्या गटाने कोरोनाच्या उत्पत्तीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, विषाणू लॅबमधूनच लीक झाला आहे. हे सर्व वैज्ञानिक सार्स फॅमिलीतील विषाणूचा अभ्यास करत आहेत. या गटाचे नेतृत्व करणारे व्हायरॉलॉजिस्ट जेसी ब्लूम यांच्या मते, हा अभ्यास डब्ल्यूएचओची टीम पोहोचेपर्यंत सुरू होता. त्यामुळे गटाला लॅबची तपासणी करू देण्यात आली नाही. तपासणीचा फक्त फार्स करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...