आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Corona Virus Vaccine USA | Us Coronavirus Vaccine Latest Research Updates On Cancer Drug For Covid 19 Patients

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संक्रमण कमी करण्याचा प्रयत्न:कोरोनाच्या रुग्णांना ब्लड कँसरचे औषध दिल्यानंतर श्वास घेण्यातील त्रास आणि इम्यून सिस्टीम कंट्रोल करता येते

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेच्या नॅशनल कँसर रिसर्च इंस्टीट्यूटच्या संशोधकांचा दावा

कँसरच्या औषधातून कोव्हिड-19 च्या संक्रमणाला कमी करता येते. ब्लड कँसरच्या औषधातून संक्रमित रुग्णाला श्वास घेण्यातील त्रास आणि जास्त अॅक्टिव्ह झालेल्या इम्यून सिस्टीमला कंट्रोल करता येते. हा दावा अमेरिकेतील नॅशनल कँसर रिसर्च इंस्टीट्यूटच्या संशोधकांनी केला आहे. संशोधकांचे म्हणने आहे की, कँसरचे औषध कोव्हिड-19 च्या उपचारात मदत करू शकते.

सुजल्यामुळे तयार होणाऱ्या प्रोटीनला ब्लॉक करेल औषध

संशोधकांच्या दाव्यानुसार, कँसरसाठी वापरण्यात येणारे 'एकैलब्रूटिनिब' कोरोनाच्या रुग्णातील ब्रूटॉन टायरोसिन कायनेज (बीटीके) प्रोटीनला ब्लॉक करते. बीटीके प्रोटीन इम्यून सिस्टीममध्ये महत्वाची भूमिका पार पाडते. अनेकवेळा इम्यून सिस्टीम जास्त अॅक्टिव्ह होते आणि ही शरिराला संक्रमणापासून रोखण्याऐवजी शरिरात सूज निर्माण करते. ही इम्यून सिस्टीममध्ये सायटोकाइनिन प्रोटीनमुळे होते. या प्रक्रियेला सायटोकाइनिन स्टॉर्मदेखील म्हटले जाते. या अवस्थेसाठी ब्रूटॉन टायरोसिन कायनेज (बीटीके) प्रोटीनचा सहभाग असतो, त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना कँसरमधील औषध दिल्यास याला ब्लॉक करता येते.

कोरोना रुग्णात उलट्याप्रकारे काम करत आहे  इम्यून सिस्टीम

संशोधकांनुसार, कोरोनाच्या रुग्णांमध्ये सायटोकाइनिन प्रोटीन अधिक प्रमाणात रिलीज होत आहे. यामुळेच इम्यून सिस्टीमची काम करण्याची पद्धत बदलत आहे. ही सिस्टीम उलटी फुफ्फुसाला नुकसान पोहचवत आहे. कोरोनाच्या 19 रुग्णांवर झालेल्या अभ्यासातून हे समोर आले आहे. त्यांच्या शरिरातील ऑक्सीजनची मात्रा कमी होऊन सुज येत होती.

औषध दिल्याच्या 1 ते 3 दिवसानंतर सुज उतरली, श्वास घेणे सोपे झाले

संशोधकांनुसार, 19 पैकी 11 रुग्णांना दोन दिवस ऑक्सीजन देण्यात आली होती. तर, इतर 8 रुग्ण 1.5 दिवस व्हेंटिलेटरवर होते. कँसरचे औषध दिल्याच्या एक ते तीन दिवसानंतर सुज उतरुन चांगला श्वास घेता आला. 11 रुग्णांना देण्यात येणारे ऑक्सीजन हटवून त्यांना डिस्टार्ज देण्यात आला.

ब्लड रिपोर्टमध्ये वाढलेले दिसले नुकसान पोहचवणारे प्रोटीन

व्हेंटिलेटरवरील 8 रुग्णांपैकी 4 रुग्णांना ठीक वाटल्यानंतर व्हेंटिलेटर काढण्यात आले. यातील दोघांना डिस्चार्ज करण्यात आला. तर, इतर दोघांचा मृत्यू झाला. या रुग्णांच्या ब्लड सँपलमध्ये समोर आले की, इंटरल्यूकिन-6 ची मात्रा वाढलेली आहे. हे प्रोटीन वाढल्यामुळेच शरिरातील सुज वाढली. 

(साइंस इम्यूनोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित शोधानुसार, क्लीनिकल प्रॅक्टिससाठी या औषधाच्या वापराचा सल्ला दिला जाऊ शकत नाही.)

बातम्या आणखी आहेत...