आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Corona Virus World News Update; China Italy | Coronavirus Outbreak China Italy Iran USA Japan France Live Today News Updates World Cases Novel Corona COVID 19 Death Toll

कोरोना जगात:ब्राझीलमध्ये एका दिवसात वाढले 40 हजार संक्रमित; जगातील संक्रमितांचा आकडा 1.33 कोटींवर

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगभरात आतापर्यंत 5.81 लाख रुग्णांचा मृत्यू झाला, तर 78.46 लाख ठीक झाले

जगभरात कोरोना व्हायरसने आतापर्यंत 1 कोटी 33 लाख 36 हजार 616 लोक संक्रमित झाले आहेत. यातील 77 लाख 82 हजार 643 ठीक झाले आहेत, तर 5 लाख 77 हजार 861 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, फ्रांसमध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणांवर पुढील काही आठवड्यांसाठी मास्क घालने अनिवार्य केले आहे. राष्ट्रपती इम्मॅनुअल मॅक्रों यांनी मंगळवारी याबाबत घोषणा केली. फ्रांसमध्ये आतापर्यंत 1 लाख 72 हजार 377 रुग्ण झाले असून 30 हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. 

10 सर्वात जास्त संक्रमित देश

देश

किती संक्रमितकिती मृत्यूकिती ठीक झाले
अमेरिका35,45,0771,39,14316,00,195
ब्राझील19,31,20474,26212,13,512
भारत9,37,48724,3155,93,080
रशिया7,39,94711,6145,12,825
पेरू3,33,86712,2292,23,261
चिली3,19,4937,0692,86,220    
मैक्सिको3,11,48636,3271,93,976
स्पेन3,03,69928,409उपलब्ध नाही
द.आफ्रीका 2,98,2924,3461,46,279
ब्रिटेन2,91,37344,968उपलब्ध नाही

ब्राझील: मृत्यूचा आकडा 74 हजारांच्या पुढे

ब्राझीलमध्ये मंगळवारी एकाद दिवसात तब्बल 41 हजार 857 नवीन संक्रमित आढळले तर 1 हजार 300 मृत्यू झाले. यासोबतच देशातील एकूण संक्रमितांचा आकडा 19 लाख 92 हजार 824 आणि 74,133 मृत्यू झाले आहेत.