आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महामारी:कोरोना युद्धात कमकुवत ठरलो; अध्यक्षांच्या सल्लागाराची कबुली, अमेरिकेतील मृतांची संख्या 5 लाखांवर

18 तासांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत काेराेना महामारीचा कहर अद्यापही थांबलेला नाही. काेराेनामुळे आतापर्यंत सुमारे २.८९ काेटी लाेक बाधित झाले असून ५.१२ लाखांहून जास्त लाेकांचा मृत्यू झाला. त्यावरून सरकार काेराेनाविराेधातील युद्धात पराभूत झाले आहे. हे अपयश अध्यक्ष जाे बायडेन यांचे मुख्य आराेग्य सल्लागार अँथनी फाैसी यांनी स्वीकारले आहे. एका कार्यक्रमात ते म्हणाले, याेग्य वेळी प्रभावी पावले उचलली गेली असती आणि ते लागू करण्यात आले असते तर देशात एवढ्या लाेकांना प्राण गमवावे लागले नसते. काेराेनाच्या विराेधात सर्वात कमकुवतपणे लढाई केल्यासारखे वाटू लागले आहे. जगभरातील इतर देशांपेक्षा सर्वात दुबळेपणाने आपला लढलाे, असे मला वाटते. अमेरिकेच्या १०० वर्षांच्या इतिहासात महामारीशी ताेंड देताना एवढी वाईट स्थिती कधीही निर्माण झाली नव्हती. लाेक या गाेष्टीची अनेक दशके चर्चा करतील, असे फाैसी यांनी म्हटल.

जाॅन हापकिन्स विद्यापीठाच्या डेटानुसार भारतात ब्राझीलपेक्षा दुपटीने मृत्यू झाले. जगातील सर्वाधिक बाधित अमेरिकेत आहेत. ही संख्या दुसऱ्या सर्वात माेठ्या लाेकसंख्येच्या भारताहून दुप्पट आहे. राजकीय विभाजनाचा देशातील महामारीच्या विराेधातील लढाईवर परिणाम झाला. मास्क वापरणे, संरक्षक उपकरणे अनिवार्य, शारीरिक अंतर राखण,गर्दी टाळण्यासारख्या गाेष्टी पाळल्या जायला हव्या हाेत्या. तसेे झाले असते तर निम्मे मृत्यू टळले असते. अमेरिकेत गेल्या पाच आठवड्यांत रुग्णसंख्येत घट झाली. मात्र दैनंदिन सरासरी मृत्यू १३०० हून जास्त झाले आहेत. ६ जानेवारीला काेराेनाची रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून आले. तेव्हा १.३२ लाख रुग्ण आढळून आले हाेते. सध्या दरराेज ६० हजारांवर रुग्ण आढळून येत आहेत.

आता एक वर्ष घालावा लागेल मास्क
फाैसी म्हणाले, लसीकरण केले जात आहे. मास्क व शारीरिक अंतर गरजेचे आहे. लसीकरण झाले तरी लाेकांनी बाहेरचे खाणे टाळावे. महामारीतून बाहेर पडण्यासाठी किमान एक वर्ष तरी मास्क लावावा लागू शकते.