आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलासा:सहा महिन्यांपर्यंत पुन्हा होणार नाही कोरोना, शास्त्रज्ञांचा दावा; टी-सेल्सवरील महत्त्वपूर्ण संशोधनाचे निष्कर्ष

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अँटीबाॅडी संपल्या तरी टी-सेल्स एखाद्या व्यक्तीस संसर्ग होण्यापासून वाचवू शकतात

कोरोनाच्या प्रारंभीपासूनच संशोधक वेगवेगळे संशोधन करत आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे संशोधन म्हणजे विषाणू व रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती समजून घेणे होय. एखाद्या रोगाचा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा किती काळ संसर्ग होऊ शकत नाही. म्हणजेच, त्यामध्ये तयार केलेल्या अँटिबॉडीज रुग्णाला किती काळ वाचवू शकतात अशी अलिकडे जगभरात चर्चा हाेती. यावरच अलिकडे पब्लिक हेल्थ इंग्लंड या ब्रिटनच्या आराेग्य सुरक्षा संस्थेचे नवे संशोधन समाेर आला आहे. यानुसार, संसर्ग हाेऊन गेल्यावर रुग्णामध्ये ज्या टी- सेल्स निर्माण हाेतात त्या ६ महिन्यापर्यंत रुग्णाला दुसऱ्यांदा संसर्ग हाेण्यापासून वाचवू शकतात. इंग्लंडच्या सार्वजनिक आराेग्य विभागाचे सल्लागार शमेज लधानी म्हणाले, १०० रुग्णांवर हे संशोधन करण्यात आले. आम्हाला दुसऱ्यांदा टी-सेल्सचे मूल्यमापन करणे अवघड झाले. त्यामुळे त्याच्यावर कमी अभ्यास केला जाताे. परंतु, चांगली गोष्ट म्हणजे संशोधनात अभ्यास केलेल्या सर्व रुग्णांमधील टी- सेल्सची पातळी ६ महिन्यानंतरही समाधानकारक हाेती. म्हणजे अँटिबॉडी संपल्या तरी टी-सेल्स एखाद्या व्यक्तीस संसर्ग होण्यापासून वाचवू शकतात.

काय आहे टी-सेल्स : अँटिबॉडीज रोगप्रतिकारक शक्तीचा असा भाग आहे जाे विषाणूवर थेट हल्ला करताे व रुग्णांना संसर्ग होण्यापासून वाचवताे. टी-सेल्स थेट विषाणूवर आक्रमण करण्याऐवजी संक्रमित पेशींवर हल्ला करतात आणि संसर्ग पसरण्यापासून रोखतात.