आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Corona World;China Allowed 4 Disputed Companies To Test, To Win The Vaccine Race, Which Is Infamous For Poor Quality And Scandal

न्यूयॉर्क टाइम्सकडून:व्हॅक्सीन बनवण्याची शर्यत जिंकण्यासाठी चीनने 4 वादग्रस्त कंपन्यांना चाचण्याची परवानगी दिली, या कंपन्या खराब क्वालिटी आणि स्कँडलसाठी प्रसिद्ध

सुई ली वीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनच्या नागरिकांना आपल्या देशातील व्हॅक्सीनवर विश्वास नाही

जगभरातील देश कोरोनावरील औषध शोधण्याचे काम करत आहेत. परंतू, चीन व्हॅक्सीन बनवण्याची शर्यत जिंकण्याच्या दिशेने आहे. चीनने आपल्या नागरिकांना आजारापासून आणि इतर देशांकडून होत असलेल्या टीकेपासून वाचण्यासाठी औषध निर्माण कंपन्याना सर्प संसाधनाची पुर्तता करत आहे. 4 कंपन्यानी मानवी चाचण्याची सुरुवातदेखील केली आहे. ही संख्या अमेरिका आणि ब्रिटेनपेक्षाही जास्त आहे.

परंतू, चीनमध्ये चाचण्या करत असलेल्या कंपन्या खराब क्वालिटी आणि इतर वादग्रस्त कारणांमुळे स्कँडलमध्ये अडकल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी मुलांना चुकीची लस दिल्याबद्दल अनेक पालकांनी प्रदर्शन केले होते. चीनने व्हॅक्सीन निर्मितीला राष्ट्रीय प्राथमिकता बनवले आहे. परंतू, यावर होणाऱ्या खर्चाची कोणतीच माहिती नाही. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, आपातकालीन व्हॅक्सीन सप्टेंबरपर्यंत तयार होईल.

चीनच्या नागरिकांना आपल्या देशातील व्हॅक्सीनवर विश्वास नाही

चीनला व्हॅक्सीन बनवण्यापेक्षा जास्त आपल्या नागरिकांचा विश्वास जिंकण्याची गरज आहे. येथील लोक चीनपेक्षा इतर देशाच्या व्हॅक्सीनवर विश्वास करत आहेत. चीनमध्ये गेट्स फाउंडेशनचे रे यिप सांगतात की, चीनच्या नागरिकांना आपल्या देशात बनणाऱ्या व्हॅक्सीवर विश्वास नाही, यामुळे भविष्यात अडचणी येऊ शकतात.

चीनी कंपन्यांना चुका लपवण्याची सवय झाली आहे

चीनच्या व्हॅक्सीन निर्माण कंपन्यांना राजकीय आधार घेऊन आपले स्कँडल लपवण्याची सवय लागली आहे. काही कंपन्यांनी रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खूप खर्च केला आहे. परंतू, त्यांनी जागतिक स्तरावर परिणाम करेल, असा एकही प्रोडक्त बनवला नाही. तर, काही कंपन्यांनी विक्री आणि वितरणावर जास्त गुंतवणूक केली आहे. यात एक लोकल डिसीज सेंटर सामील आहे. जानकारांनुसार यामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळते.चीनमध्ये व्हॅक्सीन इंडस्ट्रीचा 40 % स्टेक फर्म्समधून येतो. येथे रेग्युलेटर्स या फर्मसाटी वेगळे साधन शोधत आहेत.

व्हॅक्सीन कंपन्या आणि त्यांचे वाद

तियानजिनमधील कॅनसिनो बायोलॉजिक्स पीपुल्स लिबरेशन आर्मीचा मेडिकल भाग आहे. ही फेज 2 ट्रायलमध्ये जाणारी पहिली कंपनी होती. टेस्टिंगच्या बाबतीत कॅनसिनो बायोलॉजिक्स जगातील इतर कंपन्याच्या पुढे आहे. परंतू, या औषधाचा परिणाम होईल, याची शाश्वती नाही. 

राज्यातील सिनोफार्म ग्रुपची वुहान इंस्टीट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट्सदेखील टेस्टिंगच्या दुसऱ्या फेजमध्ये आहेत. वुहान इंस्टीट्यूट 2018 मध्ये झालेल्या डिप्थेरिया, टिटनस, काळा खोकला आणि इतर आजारांच्या खराब व्हॅक्सीन तयार करण्याच्या स्कँडलमध्ये सामील होत्या. या कंपनीचे व्हॅक्सीन लाखो मुलांना देण्यात आले होते. सरकारने कंपनीची संपूर्ण कमाई जप्त करुन, 9 अधिकाऱ्यांना शिक्षा दिली होती.

वुहान इंस्टीट्यूटविरोधात आतापर्यंत दोन वेळा खटला चालला आहे. कोर्टाच्या

कागदपत्रानुसार, औषधामुळे विचित्र परिणाम होत असल्याचे आरोप, याचिकाकर्त्यांनी लावले होते. दोन्ही प्रकरणात कोर्टाने वुहान इंस्टीट्यूटला 71,500 डॉलर (भारतीय करंसीनुसार 54 लाख रुपये) पीडितांना देण्यास सांगितले होते. तसेच, कंपनीच्या अधिकाऱ्यांवर व्हॅक्सीन खरेदी करण्यासाठी स्थानिक प्रशानाला लाच दिल्याचा आरोप आहे.

कोर्ट डॉक्यूमेंट्सनुसार सिनोवेक बायोटेकदेखील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेली आहे. बीजिंगच्या एका कोर्टाने म्हटले की, कंपनीचे एका जनरल मॅनेजरने ड्रग एवेलुएशनचे इंचार्ज चीनच्या डिप्टी डायरेक्टरला 50 हजार डॉलरची लाच दिली होती.

शास्त्रज्ज्ञांनी चाचण्यांना दिलेल्या परवानगीवर उपस्थित केले प्रश्न

कंपन्यांना दुसऱ्या फेजच्या चाचण्यांना परवानगी देण्यावर संशोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. संशोधकांचे म्हणने आहे की, दुसऱ्या फेजची सुरुवात करण्याआधी, पहिल्या फेजच्या रिझल्टचे आकलन केले पाहीजे. बीजिंगमधील शिंघुआ यूनिव्हर्सिटीमध्ये फार्मेसी स्कूलचे डीन डिंग शेंगने सांगितले की, कंपन्या असामान्य पद्धती वापरत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...