आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या डेल्टा आणि आता ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे सर्वात पीडित देशांत अमेरिकेचा समावेश झाला आहे. तसे पाहिल्या अमेरिका जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी, परंतु कोरोनामुळे या देशाचा मृत्युदर सर्वाधिक नोंदवण्यात आला आहे. श्रीमंत देशांच्या तुलनेत अमेरिकेचा मृत्युदर ६३ टक्के जास्त असल्याचे ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या आकडेवारीत म्हटले आहे. सर्व प्रकारची पायाभूत व्यवस्था असूनही अमेरिकेत जानेवारी २०२० ते जानेवारी २०२२ या दरम्यान एक लाख लोकसंख्येमागे २६५ जणांचा मृत्यू झाला.
हेच प्रमाण श्रीमंत राष्ट्रांपैकी असलेल्या बेल्जियममध्ये एक लाख लोकसंख्येमागे २४५ एवढे आहे. ब्रिटन-२४०, फ्रान्स- १९५ पेक्षा जास्त आहे. एक डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान अमेरिकेत ओमायक्रॉन संसर्ग वाढला. त्यातून श्रीमंत देशांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाणही अमेरिकेत जास्त आढळून आले. प्रती एक लाख ३५ जणांचा मृत्यू झाला. अमेरिका लसीकरणाच्या वेगातही सर्वात पिछाडीवर आहे. ६२ टक्के लोकांना दोन्ही डोस मिळाले. सरकारने प्रयत्न केल्यानंतरही ३६ टक्के लोकसंख्येने लस घेतलेली नाही.
अमेरिकेत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीची सत्ता असलेल्या २८ राज्यांतील लसीकरणाचे राष्ट्रीय प्रमाण ६२ टक्के टक्क्यांहून कमी आहे. द लँसेटच्या अभ्यासानुसार रिपब्लिकन पक्षाच्या अल्बामामध्ये ५२ टक्के, अलास्का-४८ टक्के, अॅरिझोनामध्ये ४० टक्के लोकांनाच लसीचे दोन डोस मिळाले आहेत. या राज्यांतील लोकांना लस दिली जात नाही. या राज्यांत लस सक्तीचीदेखील करता आलेली नाही.
अमेरिकेत स्थूलपणा, मधुमेहामुळेही मृत्यूचे प्रमाण वाढल्याचा दावा
जॉन हापकिन्स स्कूल ऑफ पब्लिकन हेल्थचे प्रो. डेव्हिड डाउडी म्हणाले, अमेरिकेत लसीचे डबल डोस व बूस्टर डोस घेण्याचे प्रमाण कमी असणे हेच मृत्यू वाढीचे कारण मानले जाते. कारण अमेरिकेत सुमारे १.१३ कोटी लोकसंख्येला स्थूलपणा व सुमारे ३.७ कोटी लोक मधुमेहाने पीडित आहेत. अमेरिकेची एकूण लोकसंख्या ३३ कोटी आहे. कोरोना संसर्गामुळे स्थूल व मधुमेही लोकांच्या मृत्यूची शक्यताही वाढते.
अमेरिकेत २८ टक्के बूस्टर, बेल्जियममध्ये ६२ टक्के
अमेरिकेत केवळ २८ टक्के पात्र लोकांनाच बूस्टरचा डोस देण्यात आला. बेल्जियममध्ये सर्वात जास्त ६२ टक्के बूस्टर डोस देण्यात आले आहेत. ब्रिटनमध्ये ५४ टक्के, जर्मनीत ५१ टक्के, नेदरलँड-४६ टक्के, फ्रान्स-४५ टक्के, कॅनडा- ३८ टक्के, स्वीडन-३६, ऑस्ट्रेलिया-३१ टक्के, जपान-९ टक्के लोकांनी बूस्टरचा डोस घेतला आहे. अमेरिका अनेक प्रगत देशांपेक्षा मागे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.