आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Corona Wreaks Havoc In South Korea, Which Has Never Had A Lockdown; 6 Lakh Patients Found In A Single Day | Marathi News

कोरोनाचा हाहाकार:कधीच लॉकडाऊन न केलेल्या दक्षिण कोरियामध्ये कोरोनाने केला कहर; एकाच दिवसात आढळले 6 लाख रुग्ण

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया खंडातील अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यावर जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. भारतात मात्र, कोरोनाची तिसरी लाट मंदावली असून, दैनंदिन कोरोना आकडेवारीत देखील मोठी घट पाहायला मिळत आहे. मात्र चीन, हाँगकाँग, सिंगापुरपाठोपाठ आता दक्षिण कोरियामध्येही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. दक्षिण कोरोनामध्ये गुरुवारी 6 लाख कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दक्षिण कोरिया वगळता आतापर्यंत जगातील कोणत्याही देशात एकाच दिवसात कोरोनाची इतकी प्रकरणे समोर आलेली नाहीत.

कोरोना चाचण्या वाढवल्या
दक्षिण कोरियाचे म्हणणे आहे की, कोरोना चाचणीत वाढ केल्याने देशात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. गुरुवारी दक्षिण कोरियामध्ये 6 लाख 21 हजार 317 रुग्ण सापडले आहे. कोरियाच्या प्रशासनाने संक्रमित व्यक्तीची प्रकृती गंभीर होण्यापूर्वी जोखीम असलेल्या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

मृत्यूदरात दिलासा
एकीकडे दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे मात्र, मृत्यूदरात दिलासा आहे. कोरोना रुग्णांची विक्रमी संख्या वाढत असूनही, दक्षिण कोरिया हा कोरोनामुळे सर्वात कमी मृत्यूदर असलेल्या देशांमध्ये एक आहे. साधारणपणे, जेव्हा कोरोना संसर्गाचा दर वाढतो तेव्हा त्याचा मृत्यू दर देखील वाढतो, परंतु दक्षिण कोरियामध्ये असे दिसून आले नाही.

दक्षिण कोरियामध्ये आतापर्यंत लॉकडाऊन करण्यात आले नाही
कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जगभरातील बहुंताश देशांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. मात्र, दक्षिण कोरियाने आतापर्यंत लॉकडाऊन केलेले नाही. कोरोनाशी लढवण्यासाठी हव्या त्या उपाययोजना दक्षिण कोरोनाने आखल्या होत्या. कोरोना रुग्णांची ट्रेसिंग करण्यासाठी त्यांनी आधुनिक तत्रंज्ञानाचे वापर केले होते. 2020 च्या सुरुवातीपासून येथे 8 दशलक्षाहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

चीनच्या अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन

चीनमध्ये देखील कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता 11 शहरांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या शहरातील सुमारे 3 कोटी जनता घरात बंद आहे.

जिलीन प्राताबाहेर प्रवासबंदी
उत्तर कोरिया सीमेवर असणाऱ्या जिलीन प्रांतात देखील निर्बंध लादण्यात आले आहेत. जिलीनच्या नागरिकांना प्रांताच्या बाहेर प्रवासबंदी करण्यात आली आहे. जिलीनच्या राज्यपालांनी सोमवारी एक इमरजन्सी मीटिंग बोलावली असून, एक आठवड्याच्या आत झिरो कोरोना नितीची योजना आखण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...