आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:वुहानच्या प्रयोगशाळेतच इंटर्नच्या चुकीने कोरोनाचा प्रादुर्भाव

वॉशिंग्टन/बीजिंग/पॅरिसएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • संसर्गाबद्दल तर्कवितर्क लढवले जात असतानाच अमेरिकेच्या वाहिनीचा नवा दावा

जगभरात दीड लाखाहून जास्त लोकांचे प्राण घेणाऱ्या कोरोना विषाणूबद्दल आणखी एक दावा करण्यात आला आहे. चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थीच्या हातून चुकीने या विषाणूचा प्रादुर्भाव झाला, असा दावा अमेरिकेतील वाहिनी फॉक्स न्यूजने केला आहे. त्यासंदर्भात वाहिनीने एक विशेष वृत्तांतही दिला. हा दावा व यासंबंधीच्या प्रकरणाचा तपास केला जाईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. 

कोरोना विषाणू भलेही नैसर्गिक आहे, परंतु वुहानच्या व्हायरॉलाॅजीमधून तो बाहेर पडल्याचे अमेरिकेला वाटते. तेथे सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले नसल्याने हे घडले. एका प्रशिक्षणार्थी महिला बाधित झाली होती. तिच्या संपर्कात तिचा बॉयफ्रेंड आला होता. त्यानंतर तो विषाणू वेट मार्केटपर्यंत पोहोचला, असे वृत्तांतात म्हटले आहे. सूत्रांच्या हवाल्याने तयार करण्यात आलेल्या या वृत्तांतात हा विषाणू वटवाघळात आढळून येतो आणि तो जैविक शस्त्र नाही, असे नमूद करण्यात आले आहे. परंतु वुहानच्या प्रयोगशाळेत त्यावर अभ्यास केला जात होता. प्रशिक्षणार्थी या विषाणूची पहिली बळी ठरली होती. विषाणूचा संसर्ग वाढल्याचे वेट मार्केटमधील एक ठिकाण सध्या चर्चेत आहे. परंतु वाहिन्याच्या मते मार्केटमध्ये वटवाघळे विकली जात नाहीत. प्रयोगशाळेतून प्रादुर्भाव झाल्याची माहिती दडवण्यासाठी चीनने मार्केटवर दोषारोप केले आहेत. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही जगातील प्रमुख पी-४ लेव्हलची एक प्रयोगशाळा आहे. विषाणू स्ट्रेन ठेवले, संशोधन, परीक्षणाची ही जागतिक प्रयोगशाळा आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या म्हणण्यानुसार वुहानच्या व्हायरोलॉजी प्रयोगशाळेत सुरक्षेची पुरेशी व्यवस्था नसल्यावरून अमेरिकी राजदूत कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी चिंता व्यक्त केली होती. वुहानच्या वेट मार्केटजवळील या संस्थेत धोकादायक व्हायरस व विषाणूजन्य आजाराबाबत अभ्यास केला जातो. 

कोरोना कुठूनही आलेला असो, १८४ देश परिणाम भोगताहेत : ट्रम्प

विषाणू कुठून पसरला आहे, याबाबत अमेरिका चौकशी करत आहे. प्रयोगशाळाही विषाणूच्या सुरुवातीच्या फैलावाबाबत माहिती गोळा करत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही अशा अनेक गोष्टी ऐकत आहोत. याबाबत आम्ही पूर्ण चौकशी करत आहोत. अनेक लोकांचे याकडे लक्ष आहे. यात तथ्य असल्याचे वाटत आहे. हा विषाणू कुठूनही आलेला असो, चीनमधून कुठल्याही स्वरूपात आलेला असो, मात्र याचा परिणाम १८४ देशांना भोगावा लागत आहे. वुहानमधील चतुर्थ श्रेणीच्या प्रयोगशाळेला अमेरिकेकडून केली जाणारी मदत बंद करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. 

वुहान लॅबला मदत करणार; फ्रान्स लॅबसोबत करार करणार

फ्रान्स म्हणाले, वुहानमधील पी-४ रिसर्च लॅब आणि कोविड-१९ मधील संबंधांचे कुठलेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. फ्रान्सनेच ही प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी मदत केलेली होती. राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्यानुसार, वुहान लॅब आणि कोरोनाविषयी अमेरिकेतून येणाऱ्या वृत्तांशी संबंधित कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. फ्रान्सने २००४ ला वुहानमध्ये संसर्गजन्य रोगांवर एक प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी चीनसोबत एक करार केला होता. या करारावर फ्रान्सचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री मिशेल बार्नियर यांची सही होती.

बातम्या आणखी आहेत...