आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Coronavirus Antibody; Coronavirus {COVID 19} Antibodies Research Latest Updates And Developments From USA New York City

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूयॉर्क टाइम्सकडून:संशोधकांचा दावा- कोरोनापासून ठीक झालेल्या सर्व रुग्णांच्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात

अपूर्व मंडाविलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माउंट सिनाईच्या इकॉन स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी 1343 रुग्णांच्या स्टडी रिपोर्टमध्ये केला खुलासा

कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी आतापर्यंत सर्वात चांगला पर्याय जगासमोर आला आहे, तो प्लाजमा ट्रीटमेंट आहे. जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण होते आणि तो रुग्ण ठीक होतो. तर, त्याच्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात. अशा व्यक्तींच्या रक्तातून प्लाज्मा काढून दुसऱ्या रुग्णाला दिला, तर तो रुग्ण ठीक होण्याची शक्यता जास्त आहे.   परंतू, संशोधकांचे सध्या हे माणने आहे की, प्लाजमा ट्रीटमेंटसाठी फक्त गंभीर आजारी असलेला रुग्णच उपयोगी ठरतो. कारण, हलके लक्षण असलेल्या रुग्णांमध्ये अँटीबॉडी तयार होत नाही. पण, न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई के इकॉन स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी 1343 कोरोना संक्रमितांवर केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे की, फक्त गंभीर आजारीच नाही, तर हलके लक्षण असलेल्या रुग्णाच्या शरीरातही अँटीबॉडी तयार होतात. त्यामुळे प्लाजमा ट्रीटमेंटसाठी या रुग्णांचाही वापर केला जाऊ शकतो.

या स्टडी रिपोर्टला सबमिट करणाऱ्या वायरोलॉजिस्ट फ्लोरियन क्रेमर म्हणाल्या की, कोरोना व्हॅक्सीन कधी तयार होईल, याची कोणालाच माहिती नाही. तोपर्यंत प्लाज्मा ट्रीटमेंटमधूनच कोरोना संक्रमितांना ठीक केले जाऊ शकते. यासाठी ज्या रुग्णांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाली आहे, अशा रुग्णांची मोठी मदत लागेल. या शोधाला क्रेमरच्या टीमने मंगळवार (7 मे) ऑनलाइन पोस्ट केले. परंतू, अद्याप जानकारांकडून या शोधाचा आधावा घेण्यात आला नाही.

ठीक झालेले रुग्ण कामावर जाऊ शकतात

न्यूयॉर्कमधील कोलंबिया विश्वविद्यालयमध्ये वायरोलॉजिस्ट एंजेला रॉस्मुसेन सांगतात की, सध्या जगभरातील डॉक्टरांमध्ये एक धारणा बनली आहे की, अँटीबॉडी वय, लिंग आणि संक्रमणाच्या गांभीर्यावर अवलंबून असते. पण, यारिपोर्टने दाखवून दिले आहे की, असे नाही. जवळ-जवळ सर्वच संक्रमितांमध्ये अँटीबॉडी तयार होते. अँटीबॉडी कोरोना व्हायरसमधील पॅथोजिंस (संक्रमण पसरवणारा मुख्य घटक) ला नष्ट करण्यास सक्षम आहे. या अभ्यासात हेदेखील सांगण्यात आले आहे की, संक्रमणातून मुक्त झालेला व्यक्ती कामावर जाऊ शकतो. 
 
हलके लक्षण असलेले रुग्णही अँटीबॉडी देऊ शकतात

संशोधकांच्या टीममधील डॉ. एनिया वेजनबर्गनुसार या प्रोजेक्ट रिपोर्टला बनवण्यासाठी 15 हजारांपेक्षा जास्त संक्रमित रुग्णांना सामील केले होते. यात 3 टक्के कोरोनाचे गंभीर रुग्ण होते. इतर सर्व हलके लक्षण असलेले रुग्ण होते. टीमने 624 रुग्णांचे  परीक्षण केल्यावर आढळले की, 511 गंभीर आजारी, 42 हलके लक्षण असलेले आणि 71 एकदम कमी लक्षण असलेल्या रुग्णांमध्ये अँटीबॉडी विकसित झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...