महाराष्ट्राचा तरुण दुबई विमानतळावर झोपला आणि शेवटचे विमान सुटले, मायदेशी परतायचे होते

  • विमानतळावर अडकला, यूएईत जाऊ शकत नाही, भारतात येऊ शकत नाहीये

वृत्तसंस्था

Mar 25,2020 08:24:00 AM IST

दुबई - संयुक्त अरब अमीरात (यूएई) मध्ये कोरोना विषाणूमुळे घाबरलेल्या एका भारतीयाला मायदेशी यायचे होते. मात्र, झोपेमुळे त्याचे भारतात येणारे शेवटचे उड्डाण सुटले. आता तो दुबई विमानतळावर अडकला आहे. कारण यूएईने कोरोना रोखण्यासाठी निवासाचा व्हिसाधारकांना प्रवेश देण्यास नकार दिला आहे. अरुणसिंग महाराष्ट्रातील पुण्यातील राहणारे आहेत. ते २२ मार्च रोजी दुबई विमानतळावर आले. तेथून अहमदाबादसाठी सकाळी ४ वाजता अॅमिरेट्स एअरलाइनच्या विमानात बसणार होते. वेळेअाधी पोहोचले होते. यामुळे वेटिंग रुममध्ये आराम करू लागले व झोपले. यादरम्यान त्यांचा शेवटचा बोर्डिंग कॉल मिस झाला. अरूण यांना यूएईमध्ये पुन्हा प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली नाही.


घटस्फोट देण्यासाठी भारतात येत होते

अरुण एका बँकेत आयटी विभागात काम करतात. त्यांनी सांगितले, ही एक चूक होती. मला झोप आली कारण मी खूप तणावात होतो. मला घटस्फोट घ्यायचा आहे यामुळे मी याचिका दाखल करायला भारतात परतत होतो. सुरुवातीला मला इमिग्रेशन हॉलमध्ये परत जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र तेव्हा प्रवेश केवळ जीसीसी (आखात सहकार्य परिषद) रहिवाशांसाठी होता. मी त्यांना समजावले की, झोप आली होती.

X