आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Coronavirus Chinese Horseshoe Bats Latest Research | Coronavirus Disease (COVID 19) Circulating In Bats For Decades

कोरोनावर अमेरिकन संशोधकांचा दावा:वटवाघुळांमध्ये 70 वर्षांपासून सर्क्युलेट होत आहे कोरोना व्हायरस

वॉशिगंटन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना व्हायरसबाबत नव-नवीन माहिती समोर येत आहे. यातच आता अमेरिकेतील संशोधकांनी नवीन दावा केला आहे. अमेरिकन संशोधक मेसीज बोनी यांचा दावा आहे की, कोरोना व्हायरस 'हॉर्सशू'(वटवाघुळाची जात) मध्ये अनेक दशकांपासून सर्क्युलेट होत आहे. परंतू, याची आतापर्यंत कोणालाच माहिती नव्हती. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाची वंशावळ समजून घेण्याची गरज आहे. संशोधकांनुसार, सध्या जो कोरोना व्हायरस सर्वत्र पसरत आहे, त्याचे पूर्वज वटवाघुळांमध्ये 40 ते 70 वर्षांपासून अस्तित्त्वात आहेत.

कोरोना लॅबमध्ये तयार झाल्याच्या थेअरीवर प्रश्न

कोरोना आणि वटवाघुळांच्या कनेक्शनवर जगभरातील संशोधक रिसर्च करत आहेत. संशोधकांनी रिसर्चमध्ये मिळालेले परिणाम जारी केल आहेत. पेन्सिलवेनिया स्टेट यूनिव्हर्सिटीचे संशोधक मेसीज बोनी यांनी सांगितल्यानुसार, वटवाघुळांमध्ये इतरही व्हायरस उपस्थित असतील, यामुळे इतर संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. या रिसर्चमध्ये कोरोनाच्या त्या थेअरीवर प्रश्न उपस्थित केला आहे, ज्यात कोरोना लॅबमध्ये तयार झाल्याचे बोलले जात आहे.

हळु-हळू आपल्या पुर्वज व्हायरसपासून वेगळा झाला

ग्लासगो यूनिव्हर्सिटीचे संशोधक प्रो. डेविड रॉबर्टसन यांनी सांगितल्यानुसार, महामारी पसरणारा व्हायरस वटवाघुळामध्ये असलेल्या व्हायरसशी मिळता जुळता आहे. अनेक वर्षांपासून हा आपल्या पुर्वज व्हायरसपासून वेगळा झाला. प्रो डेविड सांगतात की, हा व्हायरस माणसापर्यंत कसा आला, हे आपल्याला जाणून घेण्याची गरज आहे.