आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना रिसर्चमध्ये चकीत करणारा दावा:एसी बसमध्ये एका कोरोना रुग्णाकडून 23 जणांना संक्रमण होऊ शकते

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

67 प्रवासी असलेल्या एअरकंडीशन बसमध्ये एक कोरोना संक्रमित रुग्ण बसलेला असेल, तर तो बसमधील कमीत कमी 23 जणांना संक्रमित करू शकतो. हा दावा चीनी रिसर्चर्सने आपल्या रिसर्चमध्ये केला आहे. रिसर्च सांगतो की, बंद ठिकाणी कोरोना वेगाने पसरतो. भारतात अनलॉकची व्याप्ती वाढविली जात आहे आणि सार्वजनिक वाहतुकीमुळे गर्दी वाढत आहे. म्हणूनच, हे संशोधन तुम्हाला सतर्क करणारे आहे.

अमेरिकन मेडिकल असोसिएशन जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, पूर्व चीनमध्ये एका बसमधून संक्रमण पसरल्याची घटना समोर आली आहे. ज्या बसमध्ये एकच हवा परत-परत सर्कुलेट होत होती, त्यात कोरोना पसरण्याचा धोका जास्त होता.

बसमध्ये एक सुपर-स्प्रेडर होता, ज्यात लक्षणे दिसत नव्हती

19 जानेवारीला चीनच्या झेजियांग प्रांतात झालेल्या रिसर्चमध्ये समोर आले की, बसमध्ये एक सुपर-स्प्रेडर होता, ज्यात ताप आणि खोकल्यासारखे लक्षण दिसत नव्हते. हा रिसर्च चीनमध्ये तेव्हा झाला होता, जेव्हा मास्क घालणे अनिवार्य नव्हते. बसमध्ये कोरोना संक्रमित व्यक्तीच्या पुढे आणि मागे बसलेल्या प्रवाशांनाही कोरोनाची लागण झाली.

रेस्तरॉंमध्येही असेच प्रकरण समोर आले

अजून एक असाच रिसर्च चीनच्या ग्वांगझाऊमध्ये करण्यात आला. संशोधकांनी सांगितले की, हॉटेल किंवा रेस्तराँमध्ये दोन टेबलमध्ये एका मीटरचे अंतर नसेल, तर संक्रमण पसरू शकतो. 24 जानेवारीला चीनच्या एक रेस्तराँमध्ये झालेल्या रिसर्चनुसार, तीन कुटुंबातील लोक जेवण करण्यासाठी आले होते. तिथे वुहानमधून आलेल्या एका व्यक्तीने संक्रमण पसरवले. त्याने रेस्तराँमधील 10 जणांना संक्रमण पसरवले. हा रिसर्च अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेंशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.