आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वुहान लॅबमधून लीक झाला कोरोना:शास्त्रज्ञाचा दावा; म्हणाला- अमेरिकेने चीनला व्हायरस तयार करण्याचा प्रोजेक्ट दिला, सुरक्षेत चूक झाली

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील कोट्यवधी लोकांचे बळी घेणारा कोरोना व्हायरल चीनच्या वादग्रस्त वुहान लॅबमध्ये तयार करण्यात आला होता. तथापि, हा व्हायरस तयार करण्याच्या प्रकल्पाला खुद्द अमेरिकन सरकार आर्थिक रसद पुरवत होते, असा खळबळजनक दावा अमेरिकन संशोधक अँड्र्यू हफ यांनी आपल्या द ट्रुथ अबाउट वुहान' नामक पुस्तकात केला आहे. हफ यांनी स्वतः या लॅबमध्ये काम केले आहे.

डिसेबर 2019 मध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसचा जग आजही सामना करत आहे. या प्राणघातक व्हायरसच्या संसर्गाचे जगभरात 65 कोटींहून जास्त रुग्ण आढळलेत. तर 66 लाख जणांचा बळी गेला आहे.

चीन व कोरोनाच्या संबंधांचा खुलासा करणारे संशोधक अँड्र्यू हफ.
चीन व कोरोनाच्या संबंधांचा खुलासा करणारे संशोधक अँड्र्यू हफ.

प्रयोगशाळेतून लीक झाला व्हायरस

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, हफ यांनी कोरोना व्हायरस वुहान इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजीतून (WIV) लीक झाल्याचा दावा केला आहे. या लॅबला चिनी सरकार वित्त पुरवठा करते. हफ यांच्या मते, सुरक्षेत चूक झाल्यामुळे हा व्हायरस प्रयोगशाळेच्या बाहेर पडला. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तो संपूर्ण जगात पसरला.

उल्लेखनीय बाब म्हणजे कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनच चीनची वुहान प्रयोगशाळा वादात सापडली होती. हा व्हायरस येथूनच लीक झाल्याचा आरोप केला गेला. येथे काम करणारे रिसर्चर्स कोरोना व्हायरसच्या विविध प्रजातींचा अभ्यास करत होते. त्यामुळे हा संसर्ग या संशोधकांच्या माध्यमातूनच पसरल्याचा दावा केला जात आहे. पण चिनी सरकार व वुहान लॅबने हे आरोप फेटाळून लावलेत.

महामारीसाठी अमेरिका जबाबदार

हफ यानी कोरोना महामारीसाठी अमेरिकन सरकारलाही जबाबदार धरले आहे. कारण, अमेरिकन सरकारचे वैद्यकीय संशोधन एजंसी राष्ट्रीय आरोग्य संस्थेचा (NIH) या प्रयोगशाळेला पाठिंबा होता. या संस्थेनेच चीनला हा व्हायरस तयार करण्याचे तंत्रज्ञान सोपवले होते. हा व्हायरस एखाद्या जैविक अस्त्राहून कमी नव्हता.

महामारीच्या सुरुवातीलाच वुहान लॅबमधून कोरोना लीक झाल्याच्या अनेक थेअरी पुढे आल्या होत्या.
महामारीच्या सुरुवातीलाच वुहान लॅबमधून कोरोना लीक झाल्याच्या अनेक थेअरी पुढे आल्या होत्या.

चीनला पहिल्या दिवसापासूनच होती खबर

हफ यांच्या मते, चीनला पहिल्या दिवसापासूनच कोरोना व्हायरस नैसर्गिक नव्हे तर जेनेटिकली मॉडीफाइड असल्याचे ठावूक होते. त्यानंतरही त्यांनी सुरक्षा व नागरिकांना त्याची माहिती देण्यात हयगय केली. चीनने केवळ महामारीच्या उद्रेकाच्या मुद्यावरच खोटे बोलले नाही तर हा व्हायरस नैसर्गिक ठरवण्याचाही केविलवाणा प्रयत्न केला. विशेष बाब म्हणजे अमेरिकन सरकारनेही या प्रकरणी जगाची दिशाभूल केली.

हफ यांनी केली व्हायरस तयार करणाऱ्या लॅबमध्ये नोकरी

हफ यांनी 2014 ते 2016 पर्यंत इको-हेल्थ अलायंसमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम केले. ही कंपनी मागील 10 वर्षांपासून एनआयएचकडून मिळणाऱ्या फंडिंगच्या आधारावर वटवाघूळांपासून पसरणाऱ्या कोरोना व्हायरसवर संशोधन करत आहे. हफ यांनी कंपनी व वुहान प्रयोगशाळेत विस्तृत संबंध असल्याचाही दावा केला आहे. महामारीच्या सुरुवातीपासूनच इको-हेल्थ अलायंसने हा व्हायरस नैसर्गिकपणे प्राण्यांतून माणसांत वर्ग झाल्याचा दावा करत आहे. या थेअरीचे NIHनेही समर्थन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...