आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Coronavirus News (WHO) China Latest News Updates; World Health Organization Says Alerted By Its Own Office In China

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर डब्ल्यूएचओचा दावा:कोरोना व्हायरस संक्रमण पसरण्याचा पहिला इशारा चीनने नाही तर आम्ही दिला होता, जागतिक आरोग्य संघटनेचा दावा 

जेनेवा10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डब्ल्यूएचओ योग्य वेळी कोरोना व्हायरसची माहिती देण्यात अयशस्वी ठरली, डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता आरोप
  • डब्ल्यूएचओ चीनसाठी नरमाईची भूमिका घेत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता, हा आरोप डब्ल्यूएचओने फेटाळून लावला

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ने कोरोना व्हायरस संकट सुरू होण्याविषयी एक नवीन दावा व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, वुहानमध्ये निमोनियाच्या काही घटनांची माहिती सर्वात आधी चीनने नाही, तर तेथील डब्ल्यूएचओच्या ऑफिसने दिली होती. आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की कोरोना व्हायरसवर चीनचा अहवाल 20 एप्रिलला आला होता. तर डब्ल्यूहोने वुहानमध्ये पसरलेल्या निमोनिया विषयीची माहिती 31 डिसेंबर रोजी दिली होती.

डब्ल्यूएचओने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आरोपही फेटाळून लावले. ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओ वर महामारी निवारणाची माहिती देण्याबाबत अयशस्वी ठरल्याचा आरोप लावला होता. तसेच डब्ल्यूएचओ चीनप्रति नरमाईची भूमिका घेत असल्याचा आरोप लावला होता. 

डब्ल्यूएचओने 9 एप्रिलला माहिती दिली होती

महामारीविषयी डब्ल्यूएचओने सुरुवातीची टाइमलाइन 9 एप्रिलला जारी केली होती. यामध्ये हुबेई प्रांताच्या वुहान शहराच्या आरोग्य संघटनेने 31 डिसेंबरला केवळ निमोनियाच्या प्रकरणांची माहिती दिली होती. मात्र ही माहिती एखाद्या चिनी अधिकाऱ्या दिली किंवा सांगितली याविषयी कोणतीही माहिती नव्हती.

31 डिसेंबरला व्हायरल निमोनियाची दिली होती माहिती 

डब्ल्यूएचओचे निदेशक टेड्रॉस ऐडहॉनम गेब्रिएसस यांनी प्रसे कॉन्फ्रेंसमध्ये सांगितले की, चीनमधून पहिला रिपोर्ट 20 एप्रिलला आला होता. ते म्हणाले की, ही माहिती चीनच्या अधिकाऱ्यांनी पाठवली किंवा एखाद्या स्त्रोतने याविषयी कोणतीही माहिती नव्हती. मात्र डब्ल्यूएचओने या आठवड्यात नवीन क्रोनोलॉजी जारी केली आहे. यामध्ये या घटनांविषयी सविस्तर सांगण्यात आले आहे. यामध्ये हा संकेत दिलाय की, चीनमधील डब्ल्यूएचओच्या कार्यालयाने 31 डिसेंबरला 'निमोनियाच्या साथी'विषयी सूचना दिली होती. 

बातम्या आणखी आहेत...