आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Coronavirus Out Break In World; So Far 1 Lakh 46 Thousand Patients Have Died; Britain's Princess Beatrice Marriage Cancel, US Gave $ 45 Million To Help India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगात कोरोना:आतापर्यंत 1 लाख 47 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू; आरोग्य सेवांसाठी अमेरिकेकडून भारताला 45 कोटी रुपयांची मदत

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो लंडनमधील आहे. गुरुवारी वेस्टमिंस्टर ब्रिजवर अँबुलेंस कर्मचारी आणि पोलिसांनी ताळ्या वाजवून आरोग्य कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले - Divya Marathi
हा फोटो लंडनमधील आहे. गुरुवारी वेस्टमिंस्टर ब्रिजवर अँबुलेंस कर्मचारी आणि पोलिसांनी ताळ्या वाजवून आरोग्य कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले
  • यूरोपात कोरोनामुळे सर्वात जास्त मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत, रुग्णांची संख्या 1 लाख 68 हजारांपेक्षा जास्त

जगभरात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत 1 लाख 47 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, आतापर्यंत 5 लाख 53 हजारांपेक्षा जास्त रुग्ण ठीक होऊन घरी गेले आहेत. कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त परिणाम अमेरिकेवर पडला आहे. देशात आतापर्यंत 6 लाख 78 हजार 210 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 34 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यूरोपात कोरोनामुळे सर्वात जास्त मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. तिथे रुग्णांची संख्या 1 लाख 68 हजारांपेक्षा जास्त झाली आहे.

यातच ब्रिटेनच्या राजकुमारी आणि महारानी एलिजाबेथ यांची नात बीट्रिस यांनी कोरोनामुळे आपले लग्न पुढे ढकलले आहे. बीट्रिस इडोएआर्डोसोबत लग्न करणार होत्या. यापूर्वीच त्यांनी बकिंघम पॅलेसमध्ये होणारे रिसेप्शनदेखील कँसल कले होते. स्थानित मीडियाने बीट्रिस आणि त्यांच्या होणाऱ्या नवऱ्याच्या प्रवक्त्याने सांगितलेल्या माहितीच्या आधारे सांगितले की, त्या दोघांचा लग्नाचे स्थळ बदलण्याचा कोणताच विचार नाही. दोघे या कोरोनाच्या संकटात लग्नाबद्दल विचारदेखील करत नाहीयेत. बीट्रिस योर्कचे ड्यूक प्रिंस अँड्रयू यांची मुलगी आहे.

अमेरिकेने भारताला आरोग्य सेवांसाठी 45 कोटी रुपये दिले

  अमेरिकेने भारतातील आरोग्य सेवांसाठी 5.9 मिलियन डॉलर (45 कोटी रुपये) दिले आहेत. अमेरिकेच्या परदेश विभागाने गुरुवारी याबाबत माहिती दिली. ही रक्कम संक्रमित रुग्णांच्या मदतीसाठी, महत्वाच्या मेडीकल उपकरणांसाठी, लोकांना कोरोनापासून दूर राहण्यासाठी संदेश देण्यासाठी आणि रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी कामी येईल.आतापर्यंत अमेरिकेने

भारताला 19,170 कोटी (2.8 बिलियन डॉलर) मदत केली आहे. 

लॉकडाउनवरील वादानंतर ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी आरोग्य मंत्र्यांना पदावरुन हटवले

ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी लॉकडाउनवरील वाद वाढल्यानंतर ब्राझीलचे आरोग्य मंत्री लुइज हेनरिक मॅन्डेटा यांना पदावरुन काढन टाकले. बोल्सोनारो देशातील संक्रमण रोखण्यासाठी देशभरात बंदी लागू करण्याच्या विचारात नव्हते. मॅन्डेटा यांना आरोग्य मंत्र्यांच्या पदावरुन काढल्यानंतर ते म्हणाले की, 'मॅन्डेट यांनी वेळ पाहून एका डॉक्टरप्रमाणे करायचे ते सर्व प्रयत्न केले. आयसोलेशन एक सत्य आहे, पण आम्ही सर्व काम बंद होईल, असे निर्णय घेऊ शकत नाहीत.' यापूर्वीच बोल्सोनारो यांनी कोरोनाला एक सामान्य आजार म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...