आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • International
 • Coronavirus Outbreak Covid 19 Spread Airborne Possibility WHO Updated Guidelines Aerosols Remain Suspended In The Air Or Travel Farther Than 1 Meter (long Range).; News And Live Updates

वेगाने पसरणार्‍या महामारीचे कारण:कोरोना हवेतून पसरत असल्याचे WHO ने केले कबूल; व्हायरस एरोसोलच्या माध्यमातून खूप दूरपर्यंत जात असल्याचा गाईडलाइनमध्ये दावा

2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • WHO ने जुलै 2020 मध्ये कोरोना हवेतून पसरतो याचा पुरावा नसल्याचे म्हटले होते

जगात कोरोना महामारी येऊन जवळपास एक वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला गेला आहे. विविध तज्ञ कोरोना महामारी कशी आली याचा अभ्यास करत आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरस हवेतून पसरु शकत असल्याचा दावा केला आहे. कारण आतापर्यंत यावर वेगवेगळे दावे करण्यात आले असून कोणीही याबाबत ठोस पुरावा दिला नव्हता.

डब्ल्यूएचओने नुकतेच कोरोना व्हायरसवर नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केले आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, कोरोना व्हायरस हे खराब वायुजीवन, लोकांच्या गर्दीच्या ठिकाणी फैलण्याचा धोका जास्त असतो. कारण अशा ठिकाणी व्हायरस एरोसोलच्या माध्‍यमातून खूप दूरपर्यंत जात असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या गाइडलाइनमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे डब्ल्यूएचओने आतापर्यंत कोरोना व्हायरस हवेतून पसरतो याचा पुरावा नसल्याचे सांगितलेले होते.

कोरोना कसा पसरतो? 2019 मध्ये चीनमध्ये याचा उद्रेक झाल्यापासून हा प्रश्न जोरदार चर्चेत आला आहे.

जगात कोरोना महामारीची सुरुवात चीनमधील वुहान शहरातून झाली असल्याचे समोर आले होते. तेव्हापासून कोरोना कसा पसरतो? याबाबत शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहे. जास्तीतजास्त शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, मनुष्य शिंकताना, बोलताना, गाताना किंवा खोकलताना जे थेंब बाहेर येतात त्याचे आकार 5 मायक्रोमीटरपेक्षा कमी असल्यामुळे ते जास्त वेळ हवेत तरंगू शकत नाही. त्यामुळे कोरोना हवेतून पसरतो हे सिद्ध होत नाही.

तर दुसरीकडे, ते थेंब 5 मायक्रोमीटरपेक्षा कमी असल्यामुळे हवेव्दारे दुरपर्यंत जाऊ शकतात व यामुळे कोरोना पसरण्याचा धोका वाढत असल्याचे काही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

WHO ने जुलै 2020 मध्ये कोरोना हवेतून पसरतो याचा पुरावा नसल्याचे म्हटले होते
डब्ल्यूएचओने जुलै 2020 मध्ये आपल्या गाइडलाइनमध्ये कोरोना व्हायरस हवेतून पसरतो याचा पुरावा नसल्याचे म्हटले होते. त्यांनी जारी केलेल्या नवीन मागदर्शक सूचनांनुसार कोरोना व्हायरस एखाद्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तोंडातील किंवा नाकातील थेंब, कपडे, भांडी, फर्निचर इ. च्या संपर्कात आल्यामुळे पसरत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने इतर लोकांनी मास्क वापरण्यापेक्षा संक्रमित रुग्णांनी मास्क वापरावा असा सल्ला दिला होता.

कोरोना विषाणूचा प्रसार कसा होतो? डब्ल्यूएचओने दिली होती तीन कारणे

 • मिळालेल्या पुराव्यानुसार, कोरोना व्हायरस मुख्यतः एकमेकांशी जवळचा संपर्क असणार्‍या लोकांमध्ये पसरतो. सामान्यत: 1 मीटरपेंक्षा कमी अंतरावर असतो.
 • कोरोना व्हायरस हवेशीर किंवा गर्दीच्या बंद ठिकाणी पसरतो. कारण एरोसोल हवेमध्ये मीटरपेक्षा जास्त अंतरावर जाऊ शकतात.
 • लोकांनी व्हायरसने दूषित असलेल्या पृष्ठभागास स्पर्श केल्यास बाधित होऊ शकतात. कारण लोक हात स्वच्छ न करता नाक, तोंड किंवा डोळे यांना स्पर्श करतात.

WHO मार्गदर्शकतत्त्वातील हे बदल विशेष का आहे?

 • कोरोना विषाणू हे हवेतून एक मीटर किंवा सहा फूटापेंक्षा जास्त दूर जाऊ शकतो, असे आता जगभरात गृहित धरले जाईल.
 • एरोसोलद्वारे कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याचा संशय आल्यानंतर कोरोना टाळण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जोडली जाऊ शकतात.
 • विशेषतः कार्यालय, घर, शाळा-महाविद्यालय आणि मॉलसारख्या बंद असलेल्या ठिकाणी नवीन सल्ला दिला जाऊ शकतो.
 • भारतातील कोविड 19 टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्हीके पॉल यांनी अलीकडेच घरातदेखील मास्क घालण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला डब्ल्यूएचओच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वाशी सुसंगत आहे.
 • सोसायटी किंवा निवासी अपार्टमेंटमध्ये मोठ्या संख्येने कोरोनाचे प्रकरण का आढळत आहे हे यावरुन समजून येईल.
बातम्या आणखी आहेत...