आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Coronavirus Outbreak In World Cases And Deaths 10 August 2020 News And Updates; World Cases Novel Corona COVID 19 Death Toll

जगात कोरोना:जगभरात कोरोनाचे 2 कोटी रुग्ण; 50 लाख रुग्ण 20 दिवसांत, यात 9.72 लाख (19.44%) भारताचे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 11% भारतात, सर्वात कमी 22.5% सक्रिय रुग्ण आशियात

कोरोना संसर्गवाढीचा वेग सतत वाढत आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत जगात २ कोटींहून अधिक रुग्ण होतील. ५० लाख रुग्ण गेल्या फक्त २० दिवसांत वाढले आहेत. यात ९.७२ लाख (१९.४४%) भारताचे आहेत. मात्र, जगातील एकूण रुग्णांपैकी भारतात सध्या ११% रुग्ण आहेत. गेल्या आठवड्याची सरासरी पाहता जगातील ६३% नवे रुग्ण केवळ भारत (२८.८२%), अमेरिका (२०.६४%) आणि ब्राझीलमध्ये (१७.६४%) आढळले. म्हणजे १/४ रुग्ण आता भारतात आहेत. हे ३ देश सोडले तर उर्वरित जगात केवळ ३७% रुग्ण आढळत आहेत. दिलासा म्हणजे जगात १४ दिवसांपासून नव्या रुग्णांची सरासरी वाढली नाही. डब्ल्यूएचओनुसार, ब्राझील व अमेरिकेत नवे रुग्णसंख्या स्थिर, तर भारतात मात्र ती सतत वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...