आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Coronavirus Outbreak In World |World Cases Novel Corona COVID 19 Death Toll China Italy Iran USA Japan France 24 May News Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगात कोरोना:स्पेनमध्ये दिवसभरात संसर्ग तिप्पट, मृतांचे प्रमाण वाढले 13 पट; टाॅप 10 बाधित देशांत अमेरिका अव्वल

माद्रिदएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
स्पेनची राजधानी माद्रिद येथे लोकांनी सरकारविरोधी निदर्शने केली. सरकार कोरोना संकटाचा मुकाबला करण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप निदर्शकांनी केला. - Divya Marathi
स्पेनची राजधानी माद्रिद येथे लोकांनी सरकारविरोधी निदर्शने केली. सरकार कोरोना संकटाचा मुकाबला करण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप निदर्शकांनी केला.
  • टाॅप 10 बाधित देशांत अमेरिका अव्वल, युराेपातील 6, मध्य-पूर्वेतील 2 देश समाविष्ट

स्पेनमध्ये कोरोनाने पुन्हा कहर सुरू केला आहे. येथे एका दिवसात बाधित तीन पटीने वाढले. स्पेनमध्ये १७८७ नवे रुग्ण आढळून आले. आदल्या दिवशी ५९३ रुग्ण आढळून आले होते. स्पेनमध्ये ४ टप्प्यांत लॉकडाऊन उठवण्यात येत आहे. त्याचा पहिला टप्पा ११ मेपासून सुरू झाला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच नव्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते. लॉकडाऊन उठवण्यापूर्वी सर्वाधिक १३७७ नवे रुग्ण आढळून आले होते. स्पेनमध्ये एका दिवसात कोरोनामुळे अचानक १३ पटीने मृत्यू वाढले. येथे ६८८ नवे मृत्यू नोेंदवण्यात आले आहेत. एक दिवस आधी ५२ एवढी मृतांची संख्या होती. देशात लॉकडाऊन उठवण्यात आल्यानंतरचा हा मृतांचा विक्रमी आकडा सांगण्यात आला. लॉकडाऊन उठवल्यानंतर १४ मे रोजी सर्वाधिक २१७ जणांचा मृत्यू झाला होता. स्पेनमध्ये आतापर्यंत २ लाख ८१ हजार ९०४ रुग्ण आढळून आले आहेत, तर २८ हजार ६२८ जणांचा मृत्यू झाला. जगातील टॉप-१० कोरोनाबाधित देशांत अमेरिका पहिल्या स्थानी आहे. यादीत युरोपातील ६, तर मध्य-पूर्वेतील दोन देशांचा समावेश आहे.

स्पेनची राजधानी माद्रिद येथे लोकांनी सरकारविरोधी निदर्शने केली. सरकार कोरोना संकटाचा मुकाबला करण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप निदर्शकांनी केला.

युरोपीय संघ : युरोपने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तयार व्हावे : तज्ञ

युरोपीय संघाच्या कोविड-१९ रिस्पॉन्स टीमच्या संचालक अँड्रिया अमॉन म्हणाल्या, युरोपने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी सज्ज राहिले पाहिजे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथील आरोग्य अर्थशास्त्राच्या तज्ञ एलिस्टेयर मॅक्गुइर म्हणाल्या, आता आम्हाला बरे होण्याचा दर काय आहे? याबद्दलची माहिती मिळाली आहे. परंतु संपर्काबद्दलचा तपशील अजून पुरेसा ठाऊक नाही. कोरोनामुळे एखादा भाग मुक्त होणे असा यशस्वी लॉकडाऊनचा अर्थ नव्हे.

रशियाचे हाल : संसर्ग वेगात, पहिल्यांदाच दिवसभरात १५० जणांचा मृत्यू

रशियात संसर्ग वेगाने सुरू आहे. देशात एकूण ३ लाख ३५ हजार ८८२ रुग्ण आढळून आले, तर ३ हजार ३८८ जणांनी प्राण गमावले. एका दिवसात सर्वाधिक १५० जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १ लाख ७ हजार ९३६ जणांवर यशस्वी उपचार झाले. इतर बाधित देशांच्या तुलनेत रशियातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मात्र कमी आहे. लोकांमधील संसर्गाची माहिती वेळीच मिळू लागली आहे. त्यामुळे रशियातील मृत्यूदर कमी असल्याचा दावा डॉ. एलिना मॅलिनिकोवा यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...