आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Coronavirus Outbreak | Lab Grown Coronavirus Theory, World Health Organization (WHO), WHO, Wuhan Lab, Covid 19 Cases In World; News And Live Updates

कोरोना व्हायरस काय चीनने तयार केले:जगातील मोठे शास्त्रज्ञ म्हणाले - लॅबमधून व्हायरस गळतीचा सिद्धांत गंभीरपणे घ्या, आत्ताच याला डिसमिस करता येणार नाही

लंडन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 30 लाख लोकांचा बळी गेला आहे

कोरोना व्हायरसची उत्पत्ती 2019 मध्ये चीनच्या वुहान शहरातून झाली असल्याचे मानले जाते. कोरोना महामारीने संपूर्ण जगाला विळाखा घातला आहे. परंतु, हे व्हायरस कोठून आले. कसे तयार झाले याचा अद्याप कोणताच पुरावा समोर आला नाही. एका वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला गेला तरी या व्हायरसचे रहस्य कायम आहे. परंतु, या विषयावर जगातील टॉप शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, लॅबमधून व्हायरस गळतीचा सिद्धांत गंभीरपणे घ्यायला हवा. कारण जोपर्यंत हे सिद्धांत चुकीचा आहे असे समोर येत नाही. तोपर्यंत याला गंभीरपणे घेतले पाहिले असेही ते म्हणाले.

अद्याप अधिक तपासाची आवश्यकता
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 30 लाख लोकांचा बळी गेला आहे. तर 16.25 कोटी लोक कोरोना महामारीच्या विळाख्यात आले आहे. त्यामुळे याचा शोध घेण्याकरीता जगातील टॉप शास्त्रज्ञांचे पथक काम करत आहे. या पथकामध्ये 18 लोकांचा समावेश असून त्यांनी संबंधित प्रकरणात महत्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे.

या पथकात केंब्रिज विद्यापीठातील क्लिनिकल मायक्रोबायोलॉजिस्ट रवींद्र गुप्ता, फ्रेड हचिन्सन कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये इवॉल्यूशन ऑफ वायरसचा अभ्यास करणारे जेसी ब्लूमचा यांचा समावेश आहे. कोरोना व्हायरसचा अंतिम शोध घेण्यासाठी अद्याप अधिक तपासाची आवश्यकता असल्याचे यांचे म्हणणे आहे.

डब्ल्यूएचओचे अनेक घटकांकडे दुर्लक्ष
स्टॅनफोर्ड येथील मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक, डेव्हिड रेलमन यांच्यासह अनेक शास्त्रज्ञांनी विज्ञान जर्नलमध्ये याबाबतीत खुलासा केला आहे. व्हायरस हे एखाद्या प्रयोगशाळेतून किंवा अनुवांशिक स्पिलओव्हरमधून अचानकपणे बाहेर पडण्याच्या सिद्धांताला नाकरले जाऊ शकत नसल्याचे रेलमन यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, डब्ल्यूएचओने कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीवरुन अनेक घटकांकडे दुर्लक्ष केले आहे.

WHO चे पथक 4 आठवड्यापर्यंत चीनमध्ये होते
जागतिक आरोग्य संघटनेने या विषयावर एक अवहाल प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये त्यांनी कोरोना व्हायरस हे वटवाघुळापासून मानवापर्यंत आले असल्याचे म्हटले होते. परंतु, लॅबमधून बाहेर पडण्याच्या सिद्धांताला त्यांनी नाकारले होते. विशेष म्हणजे याकरीता डब्लूएचओच्या पथकाने जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात वुहानसह त्यांच्या आजूबाजूच्या क्षेत्रात 4 आठवड्यापर्यंत तपासणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...