आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना अलर्ट- 90 दिवसांत 60% चिनी संक्रमित:बीजिंगमध्ये 24 तास अंत्यसंस्कार, 2000 पर्यंत वेटिंग; रुग्णालयांत बेड नाही

बीजिंग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
3 महिन्यांत जगातील 10% लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज आहे.

चीनमध्ये कोरोनावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर तेथे संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत आहे. झिरो-कोविड पॉलिसी रद्द केल्यानंतर कोरोनाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, रुग्णालयातील सर्व खाटा तुडुंब भरल्या आहेत. औषधे नाहीत, जीथे आहेत तिथे लांबच लांब रांगा लावाव्या लागतात.

बीजिंगमधील स्मशानभूमीत 24 तास अंत्यसंस्कार केले जात आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, त्यासाठीची प्रतीक्षा यादी 2000 वर पोहोचली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे दिवसात नव्हे तर तासांत दुप्पट होत आहेत.

अमेरिकन शास्त्रज्ञ आणि महामारी तज्ज्ञ एरिक फेगल-डिंग यांनी सोशल मीडियावर चीनचा धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रुग्णालये, स्मशानभूमी आणि मेडिकल स्टोअर्सची चिंताजनक स्थिती दिसून येत आहे. त्यांनी कोरोनाबाबत मोठा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, 90 महिन्यांत चीनची 60% लोकसंख्या आणि जगातील 10% लोकांना कोरोनाची लागण होईल. जवळपास 10 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.

नुकताच अमेरिकेच्या इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (IHMI) नेही असाच अंदाज वर्तवला होता.

चीनमध्ये पहिली लाट, सुट्ट्यांमुळे जानेवारीत दुसरी लाट येण्याची भीती

चीनमध्ये एक आठवडाभर लूनर ईयर सेलिब्रेशन सुरू आहे. त्यासाठी देशात लाखो लोक येतात आणि जातात.
चीनमध्ये एक आठवडाभर लूनर ईयर सेलिब्रेशन सुरू आहे. त्यासाठी देशात लाखो लोक येतात आणि जातात.

तज्ज्ञांच्या मते, संभाव्य तीन लहरींपैकी पहिली लहर सध्या चीनमध्ये सुरू आहे. त्यानंतर जानेवारीच्या मध्यात दुसरी लाट येईल. सध्या देशात आठवडाभर लूनर ईयर सेलिब्रेशन म्हणजेच चंद्र वर्षाचा उत्सव सुरू आहे, त्यामुळे लाखो लोक देशात येतात आणि जातात. अशा परिस्थितीत रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

तिसरी लाट फेब्रुवारी ते मार्चच्या अखेरीस येऊ शकते. यावेळी सर्व लोक सुट्ट्या लक्षात घेऊन परततात. अशा परिस्थितीत, अधिक लोक संसर्गाची तक्रार करू शकतात.

2023 च्या एप्रिलमध्ये सर्वाधिक रुग्ण, लाखो मृत्यूची भीती

नुकताच चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. IHMI ने अंदाज व्यक्त केला आहे की 2023 पर्यंत चीनमध्ये कोरोनामुळे 10 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होईल. चीनमधील कोविड निर्बंध उठवल्यानंतरची परिस्थिती लक्षात घेऊन हे अंदाज लावण्यात आले आहेत.

अहवालानुसार, एप्रिलच्या सुरुवातीला चीनमध्ये कोरोनाच्या प्रकरणांची संख्या कमाल पातळीवर असेल. तोपर्यंत मृतांचा आकडा 3 लाख 22 हजारांवर पोहोचण्याची शक्यता आहे. आयएचएमआयचे संचालक क्रिस्टोफर मर्रे यांच्या मते, एप्रिलपर्यंत चीनच्या लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली असेल.

चीनमधील लोक लसीकरणावर विश्वास ठेवत नाहीत, 50% वृद्धांनी लसीकरण केलेले नाही

चीनचा दावा आहे की, 90% लोकसंख्येला लसीचे सर्व डोस मिळाले आहेत.
चीनचा दावा आहे की, 90% लोकसंख्येला लसीचे सर्व डोस मिळाले आहेत.

चीनचा दावा आहे की, त्यांच्या लोकसंख्येपैकी 90% नागरिकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. म्हणजेच त्यांना लसीचे सर्व डोस मिळाले आहेत. परंतु 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या केवळ 50% लोकांना पूर्णपणे लसीकरण केले गेले आहे. त्यांना गंभीर संसर्ग होण्याची भीती असते.

याचे मुख्य कारण म्हणजे लसीवर लोकांचा विश्वास नसणे. त्याचे दुष्परिणाम काहींमध्ये दिसून येतात, जे उर्वरित लोकांना डोस घेण्यास प्रवृत्त करतात. हे विशेषतः वृद्धांमध्ये होत आहे. अशा लोकांचे म्हणणे आहे की, लस घेण्याऐवजी ते व्हायरसचा सामना करणे पसंत करतील. याशिवाय सरकारनेही लसीकरण सक्तीचे केलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...