आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक आरोग्य संघटनेने अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस व्हॅक्सीनला आपातकालीन मंजुरी दिली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर आता हे व्हॅक्सीन इंटरनॅशनल कोव्हॅक्स कॅम्पेन अंतर्गत गरीब देशांना पुरवता येईल. जॉन्सन अँड जॉन्सनच्या या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे हे इतर व्हॅक्सीनसारखे दोन-दोन वेळा लावण्याची गरज नाही. एकाच डोसमध्ये हे व्हॅक्सीन दिले जाते.
जगात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची आकडेवारी पाहता ब्राझील आता भारताला मागे सोडून दुसरा सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनला आहे. या ठिकाणी शुक्रवारी 84,047 कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे, ब्राझीलमध्ये एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 1 कोटी 13 लाख 68 हजार 316 वर गेला. भारतात शुक्रवारी संध्याकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार, 1 कोटी 13 लाख 33 हजार 491 कोरोना रुग्ण असून कोरोना रुग्णसंख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
जगात गेल्या 24 तासांमध्ये 4.85 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. तसेच 9 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा जीव गेला. आतापर्यंत 9 कोटी 62 लाख पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले. तर आतापर्यंत एकूण 26.50 लाख लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. जगभरात सद्यस्थितीला 2 कोटी 6 लाखपेक्षा अधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही आकडेवारी www.worldometers.info/coronavirus वरून आहे.
अमेरिकेत 10 कोटी लोकांचे लसीकरण
अमेरिकेत कोरोना लसीकरणाचा आकडा आता 10 कोटींवर गेला आहे. US सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात 13.3 कोटी डोस देण्यात आले आहेत. त्यात 3.5 कोटी लोकांना कोरोना व्हॅक्सीनचा दुसरा डोस सुद्धा देण्यात आला आहे. तर जवळपास 6.6 कोटी लोकांना व्हॅक्सीनचे पहिले डोस देण्यात आले आहेत.
कोरोना संक्रमितांच्या आकाडेवारीनुसार टॉप-10 देश
देश | संक्रमित | मृत्यू | बरे झाले |
अमेरिका | 29,990,597 | 545,379 | 22,029,789 |
ब्राझील | 11,368,316 | 275,276 | 10,000,980 |
भारत | 11,333,491 | 158,483 | 10,971,347 |
रशिया | 4,370,617 | 91,220 | 3,973,029 |
UK | 4,248,286 | 125,343 | 3,424,092 |
फ्रान्स | 4,015,560 | 90,146 | 271,678 |
स्पेन | 3,183,704 | 72,258 | 2,857,714 |
इटली | 3,175,807 | 101,564 | 2,564,926 |
तुर्की | 2,850,930 | 29,356 | 2,670,273 |
जर्मनी | 2,559,296 | 73,790 | 2,345,600 |
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.