आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Coronavirus Outbreak Vaccine Latest Update; USA Brazil And France Cases And Deaths From COVID 19 Virus News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना जगात:फ्रान्समध्ये तीन आठवड्यासाठी शाळा बंद, एक महिन्यासाठी देशातील प्रवासावर बंदी; ब्राझीलमध्ये सलग दुसर्‍या विक्रमी मृत्यू

पॅरिस13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फ्रान्समध्ये एक महिन्याचा लॉकडाऊन

कोरोना महामारीच्या तिसर्‍या लाटेमुळे फ्रान्समध्ये सक्रीय रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले की, देशात पुढील तीन आठवड्यांसाठी शाळा बंद असणार आहे. तर दुसरीकडे त्यांनी देशातील प्रवासावरदेखील पुढील एक महिन्यासाठी बंदी घातली आहे. त्यांनी बोलताना पुढे म्हटले की, या कोरोना महामारीच्या तिसर्‍या लाटेतून वाचण्यासाठी लॉकडाऊन करावेच लागणार आहे. नाहीतर यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन याचे परिणाम हॉस्पिटलवर जाणवतील. जर आम्ही यावर वेळीच उपाय केले नाहीतर आपण कोरानावरील नियंत्रण गमावून बसू असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.

ब्राझील देशात कोरोना महामारीमुळे तेथील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. गेल्या चोवीस तासात या देशात 89,200 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. दरम्यान यात 3950 लोकांचा मृत्यू झाला असून हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 30 मार्च रोजी 3668 लोकांचा मृत्यू झाला होता. येथे आतापर्यंत 1.27 कोटी लोक कोरोनाच्या विळ्याख्यात आले असून यामध्ये 3.21 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

फ्रान्समध्ये एक महिन्याचा लॉकडाऊन
राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले की, देशात लॉकडाऊनची प्रक्रिया 2 एप्रिलपासून राबवली जाणार असून ही पुढील चार आठवड्यापर्यंत कायम असणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व बंद राहणार आहे. लोकांना कार्यालयात न येता घरुनच 'वर्क फ्रॉम होम' करावे लागेल. तसेच सार्वजनिक सभांसोबच विनाकारण आपल्या घरांपासून 10
किलोमीटर दूर प्रवास करणार्‍या लोकांवरदेखील बंधन असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...