आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Coronavirus Outbreak Vaccine Latest Update; USA Brazil Russia UK France Cases And Deaths From COVID 19 Virus

कोरोना अपडेट:फ्रांसची राजधानी पॅरिससह 16 शहरांमध्ये एक महिन्याचा लॉकडाउन; यूरोपीय देशांमध्ये एस्ट्राजेनेका लसीचा पुन्हा वापर सुरू

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फ्रांसमध्ये कोरोनाची तिसरी लाट

फ्रांसमध्ये कोरोनाची तिसरा लाट आली आहे. यामुळे आता राजधानी पॅरिसमध्ये एका महिन्याचा लॉकडाउन लावण्यात आला आहे. पॅरिससह इतर 15 शहरांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून एक महिन्याचा लॉकडाउन असेल. फ्रांसचे पंतप्रधान जीन कॅस्टेक्स म्हणाले की, हा लॉकडाउन आधिप्रमाणे कडक नसेल. फ्रांसमध्ये मागील 24 तासात 35,000 नवीन संक्रमित आढळले आहेत.

तिकडे, यूरोपियन मेडिसिन एजेंसी (EMA)च्या क्लीनचिटनंतर यूरोपियन देश लवकरच एस्ट्राजेनेका-ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीचा वापर पुन्हा सुरू करणार आहेत. यूरोपियन देशांनी म्हटले की, स्पेन, पुर्तगाल, नीदरलंड, जर्मनी, इटली, फ्रांस, लात्विया, लिथुआनिया आणि साइप्रससह अनेक देशात लवरच या लसीचा वापर सुरू केला जाईळ. तर, आयरलंड आणि स्वीडनमध्ये परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल.

फ्रांसमध्ये तिसरी लाट

फ्रांसमध्ये कोरोनाचा संसर्ग फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक नवीन-नवीन व्हेरिएंटसह फ्रांसमध्ये महामारीची तिसरी लाट आली आहे. देशतील 16 राज्यांमध्ये कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाउनच्या काळातही आवश्यक वस्तुंची विक्री सुरू ठेवली जाईल. याशिवाय, नर्सरी, एलिमेंट्री आणि हायस्कूलदेखील सुरू राहतील. या लॉकडाउनच्या काळात लोक घराबाहेर पडू शकतील. पण, त्या सर्वांना कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

जगातील टॉप-10 संक्रमित देश

देश

संक्रमितमृत्यूठीक झाले
अमेरिका30,358,880552,34722,523,799
ब्राझील11,787,600287,79510,339,432
भारत11,513,945159,40511,081,335
रशिया4,428,23993,8244,037,036
UK4,280,882125,9263,593,136
फ्रांस4,181,60791,679278,263
इटली3,306,711103,8552,655,346
स्पेन3,212,33272,9102,945,446
तुर्की2,950,60329,7772,770,638
जर्मनी2,628,62974,8782,383,600
बातम्या आणखी आहेत...