आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Coronavirus Outbreak Vaccine Latest Update; USA Brazil Russia UK France Cases And Deaths From COVID 19 Virus Brazil News And Updates

कोरोना जगात:ब्राझीलमध्ये सलग दुसर्‍या आढळले 50 हजारांपेक्षा कमी रुग्ण;  कॅनडामध्ये 55 वर्षाखालील लोकांना ॲस्ट्रॅजेनेका लस घेण्यास मनाई

साओ पाउलो / वॉशिंग्टन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगातील 15 देशात ॲस्ट्रॅजेनेका लसीवरील बंदी हटवण्यात आली आहे

जगात कोराना महामारीचे संक्रमित रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना ब्राझीलमधून चांगली बातमी आली आहे. येथे सलग दुसर्‍या दिवशी 50 हजारांपेक्षा कमी सक्रीय रुग्ण आढळले आहे. गेल्या चोवीस तासात ब्राझीलमध्ये 42,666 नवीन सक्रीय रुग्ण आढळले असून यात 1969 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी रविवार रोजी 44,326 कोराना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते.

तर दुसरीकडे, कॅनडा देशाने 55 वर्षाखालील लोकांना लसीकरणासाठी मनाई केली आहे. लसीकरणाच्या सल्लागार समितीने दिलेल्या माहितीनुसार, लोकांच्या रक्तात गाठीचे दुष्परिणामांची तक्रार समोर आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

जगातील 15 देशात ॲस्ट्रॅजेनेका लसीवरील बंदी हटवण्यात आली आहे
ॲस्ट्रॅजेनेका लसीवर जगातील 15 देशांनी बंदी घातली होती. यामध्ये जर्मनी, फ्रांस आदी देशांचा समावेश होता. दावा करण्यात आला होता की, या लसीमुळे लोकांच्या रक्तात गाठी निर्माण होतात. परंतु, लसीमुळेच हे झाले असल्याचे पुरावे न मिळाल्यामुळे या देशांत लसीकरणाची प्रकीया पुन्हा एकदा राबवली जाणार आहे.

ईएमए आणि डब्ल्यूएचओने दिली होती क्लीन चिट
युरोपियन मेडिसीन एजन्सी (ईएमए) आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) यांनी स्पष्ट केले होते की, या लसीमुळेच रक्ताच्या गाठी झाल्याचे स्पष्ट झालेले नाही. यामुळे लस वापरण्यात कोणतीही अडचण नसल्याचे या संस्थांनी म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...