आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Coronavirus Outbreak Vaccine Latest Update; USA Brazil Russia UK France Cases And Deaths From COVID 19 Virus Corona Pendamic News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना जगात:एकाच दिवसात जगात आढळले 5.80 लाख सक्रीय रुग्ण; पाकिस्तानसह जगातील 37 देशांना कोरोनाच्या तिसर्‍या आणि चौथ्या लाटेची भीती

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकामधील फ्लोरिडातील तरुणांमध्ये व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रसार

जगात कित्येक देशात लसीकरणाची मोहीम सुरु झाल्यावरदेखील सक्रीय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या चोवीस तासात जगात 5.80 लाख नवीन सक्रीय रुग्ण आढळले असून यामध्ये 9812 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी प्रत्येक दिवस 4 लाखांवर नवीन रुग्ण सापडत होते. जगात वाढत असलेल्या नवीन रुग्णांमुळे पाकिस्तानासह जगातील 37 देशांना कोरोनाच्या तिसर्‍या आणि चौथ्या लाटेची भीती वाटत आहे. यामध्ये अमेरिका, ब्राझील, फ्रांस, जर्मनी, पोलँड, इटली, यूक्रेन आणि स्पेन आदी देशांचा समावेश असून यातील काही देशांनी दुसर्‍या व काही देशांनी तिसर्‍या लाटेची अनुभूती घेतलेली आहे.

अमेरिकामधील फ्लोरिडातील तरुणांमध्ये व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रसार
अमेरिकेतून आलेल्या धक्कादायक अवहालात हे समोर आले आहे की, फ्लोरिडामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेष म्हणजे यामध्ये तरुणांना याची लागण होत आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टने दिलेल्या रिपोर्टनुसार, येथे दररोज पाच हजार रुग्ण आढळत असून यामध्ये रुग्णांचे वय 40 वर्षाखालील आहे.

आतापर्यंत जगात 12 कोटी लोक कोरोनाने प्रभावित
कोरोना महामारीच्या विळ्याख्यात जगात आतापर्यंत 12 कोटी लोक आले असून यातील 10.29 लोक बरे झाले आहे. 27.95 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सध्याच्या घडीला जगात 2.20 कोटी लोकांवर उपचार सुरु आहेत. यातील 93,661 प्रकृती ही गंभीर असून 2.19 कोटी कोरोना रुग्णांचे लक्षण कमी आहेत.

बातम्या आणखी आहेत...