आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Coronavirus Outbreak Vaccine Latest Update; USA Brazil Russia UK France Cases And Deaths From COVID 19 Virus; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना जगात:कोरोना संक्रमितांची संख्या 15 कोटींवर; WHO म्हणाले, 17 देशांमध्ये आढळला भारतीय विषाणूचा स्ट्रेन

जेनेवा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील कित्येक देशांमध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, जगात गेल्या चोवीस तासांत 8 लाख 85 हजार 604 नवीन रुग्ण आढळले असून यामध्ये 15 हजार 284 लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगातील 17 देशांमध्ये भारतीय विषाणूचा स्ट्रेन आढळून आला असल्याचे म्हटले आहे. डब्ल्यूएचओने याला 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' (VOI) घोषित केले असून B.1.617 या डबल म्यूटेंट व्हेरिएंटमुळेच भारतात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत असल्याचा दावा केला आहे.

जगात आतापर्यंत 15 कोटींपेक्षा जास्त लोक कोरोना महामारीच्या विळ्याख्यात सापडले असून यामध्ये 31.63 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, यामध्ये गेल्या चोवीस तासांत 12.82 लाख लोक उपचार घेत बरे झाले आहे. सध्या जगात सक्रिय रुग्णांची संख्या 1.93 कोटी असून यातील 1.92 कोटी लोकांना कोरोनाचे साधे लक्षण आहेत, तर उर्वरित 1.10 लोकांची प्रकृती गंभीर आहे.

गेल्या 24 तासांत 8.85 लाख नवे रुग्ण सापडले
जगात गेल्या चोवीस तासांत 8 लाख 85 हजार 604 नवीन रुग्ण आढळले असून यामध्ये 15 हजार 284 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्ण संख्या येण्याच्या बाबतीत भारतात गेल्या सोमवारी 42% प्रकरणे समोर आली होती. भारतात गेल्या चोवीस तासांत 3 लाख 79 हजार 459 नवीन रुग्ण आढळून आले होते.

ब्रिटनचा भारताला लस देण्यास नकार
ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनूक यांनी बुधवारी संध्याकाळी सांगितले की, त्यांच्या देशात कोविड 19 लस आवश्यकतेनुसार उपलब्ध असून त्याचा मोठ्या प्रमाणात साठा नाही. त्यामुळे त्याला अ‍ॅक्सेस स्टॉक म्हणता येणार नाही. या कारणामुळे आम्ही भारताला लस देऊ शकणार नाही. ते पुढे बोलताना म्हणाले की, व्हेंटिलेटर आणि इतर आवश्यक वैद्यकीय उपकरणे नवी दिल्ली येथे पाठविली जात आहेत.

टॉप-10 देश, जेथे आतापर्यंत सर्वात जास्त संक्रमित आढळले

देशसंक्रमितमृत्यूबरे झाले
अमेरिका32,983,695588,33725,584,747
भारत18,368,096204,81215,078,276
ब्राझील14,523,807398,34313,091,714
फ्रान्‍स5,565,852103,9184,470,275
रशिया4,787,273109,3674,411,098
तुर्की4,751,02639,3984,212,461
ब्रिटन4,411,797127,4804,206,327
इटली3,994,894120,2563,431,867
स्पेन3,504,79977,9433,192,970
जर्मनी3,351,47483,0182,954,000
बातम्या आणखी आहेत...