आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Coronavirus Outbreak Vaccine Latest Update; USA Brazil Russia UK France Cases And Deaths From COVID 19 Virus News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना जगात:ब्राझीलमध्ये गेल्या चोविस तासांत आढळले 97,586 अक्टिव्ह रुग्ण; 12 वर्षाखालील मुलांसाठी फाइझर लसीची चाचणी सुरु

वॉशिंग्टन18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजघडीला संपूर्ण जगामध्ये 2.17 लोकांवर उपचार सुरु आहेत

जगात आलेल्या कोरोना महामारीच्या नव्या संक्रमनामुळे रुग्ण संख्येचा आलेख वाढतच जात आहे. यामुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जगात ब्राझीलमध्ये गेल्या चोविस तासांत सर्वात जास्त नवीन रुग्ण आढळून आले आहे. येथे एका दिवसांत 97,586 सक्रीय रुग्ण आढळले असून त्यात 2639 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून तर आतापर्यंतच सर्वात मोठा आकडा असल्याचे मानले जात आहे. अमेरिकेनंतर सक्रीय रुग्ण संख्या समोर येणाऱ्याच्या यादीमध्ये ब्राझीलचा नंबर येत असून त्यानंतर तिसऱ्या क्रमांकवर भारताचा नंबर लागतो.

त्याचबरोबर दुसरीकडे, अमेरिकेतील औषध कंपनी फायझर आयएनसी आणि जर्मन पार्टनर बायोएनटेक एसआय या कंपन्यांनी बारा वर्षाखालील मुलांच्या लसीकरणासाठी चाचणी सुरु केली आहे. कंपन्यांनी दावा केला आहे की, येणाऱ्या वर्षाच्या सुरुवातीला या वयोगटातील मुलांसाठी लस उपलब्ध केली जाणार आहे.

जगात गेल्या चोविस तासांत आढळले 6 लाख रुग्ण
गेल्या चोविस तासांत जगात कोरोनाचे 6.22 लाख नवीन रुग्ण आढळले असून यामध्ये 10 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जगात आतापर्यंत 12.60 कोटी लोक या महामारीच्या विळ्याख्यात सापडले आहे. यात 10.17 कोटी लोक उपचार घेत बरे झाले आहे. तर 27.67 लोकांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला संपूर्ण जगामध्ये 2.17 लोकांवर उपचार सुरु आहेत. हे आकडे www.worldometers.info/coronavirus या संकेतस्थळावरुन घेण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...