आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Coronavirus Outbreak Vaccine Latest Update; USA Brazil Russia UK France Cases And Deaths From COVID 19 Virus World News Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना जगात:ब्राझीलमध्ये गेल्या 24 तासांत आतापर्यंतचे सर्वात जास्त 3,600 मृत्यू; जर्मनीने शेजारी देशाच्या प्रवाशांवर लावले काही निर्बंध

न्यूयॉर्क17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इटली सरकार लसीकरण न करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार

जगात कोरोनाच्या नव्या संक्रमनामुळे नवीन रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच ब्राझीलमध्ये ही परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. ब्राझीलमध्ये गेल्या 24 तासांत सर्वात जास्त नवीन रुग्ण आढळून आले आहे. येथे एका दिवसांत 82,558 सक्रीय रुग्ण आढळले असून त्यात 3600 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून तर आतापर्यंतच सर्वात मोठा आकडा असल्याचे मानले जात आहे. यापुर्वी 23 मार्च रोजी 3,158 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. अमेरिकेनंतर सक्रीय रुग्ण संख्या समोर येणाऱ्याच्या यादीमध्ये ब्राझीलचा नंबर येत असून त्यानंतर तिसऱ्या क्रमांकवर भारताचा नंबर लागतो.

दुसरीकडे, जर्मनीने शेजारील देशातील प्रवासी वाहतुकीवर काही निर्बंध लावले आहे. फ्रान्स, ऑस्ट्रिया, डेनमार्क या आदी देशांत कोरोनाची वाढती पार्श्वभूमी लक्षात घेत कठोर निर्णय घेण्याचे ठरवले आहे. या देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी 48 तासांचे कोरोना नेगेटिव्ह अवहाल आणि दहा दिवसाचे क्वारंनटाईन अवहाल अनिवार्य केले आहे.

इटली सरकार लसीकरण न करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार
इटलीचे प्रधानमंत्री मारियो ड्राघी यांनी सांगितले की, जे कोणी आरोग्य कर्मचारी लसीकरण न करता आपली सेवा बजावत आहे, त्यामुळे इतर व्यक्तींना बाधा होण्याची शक्यता असते. या कारणामुळे इटली सरकार आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कडक करण्याच्या तयारीत आहे.

गेल्या 24 तासांत जगात सापडले 6 लाखांवर नवीन रुग्ण
गेल्या 24 तासांत जगात कोरोनाचे 6.22 लाख नवीन रुग्ण आढळले असून यामध्ये 11 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जगात आतापर्यंत 12.66 कोटी लोक या महामारीच्या विळ्याख्यात सापडले आहे. यात 10.21 कोटी लोक उपचार घेत बरे झाले आहे. तर 27.78 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला संपूर्ण जगामध्ये 2.17 कोटी लोकांवर उपचार सुरु आहेत. हे आकडे www.worldometers.info/coronavirus या संकेतस्थळावरुन घेण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...