आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Coronavirus Outbreak Vaccine Latest Update; WHO Chief Warns A Corona Will Stay In The World For A Long Time; Cases And Deaths From COVID 19 Virus; News And Live Updates

कोरोना जगात:WHO प्रमुखांचा इशारा, कोरोना जगात दिर्घकाळ राहणार; 78 कोटी लोकांच्या लसीकरणानंतरही कोरोनाचा वाढता प्रभाव

लंडन/ वॉशिंग्टन9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लसीकरणासोबत मास्क आणि टेस्टिंगची गरज - डब्ल्यूएचओ

कोरोना महामारीचा संसर्ग जगामध्ये झपाट्याने वाढत चाललेला आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस ॲडनोम गॅबियिसस यांनी कोरोनाचा संसर्ग जगात दिर्घकाळ टिकून राहण्याचा इशारा दिला आहे. टेड्रोस यांनी जगातील आशिया आणि मध्य पूर्व देशांमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रकरणावर चिंता व्यक्त केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, जगात आजघडीला 78 कोटी लोकांचे लसीकरण झाले असून तरीदेखील कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही आहे.

टेड्रोस यांच्या मते, कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क आण‍ि सामाजिक अंतर राखले पाहिजे. जगात पुन्हा एकदा पुर्वीसारखा व्यापार आणि प्रवास पाहायला आवडेल असेही ते बोलताना म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल लीड मारिया व्हॅन कर्खोवे यांनी सांगितले की, कोरोनाचे संसर्ग हे पहिल्यासारखे नसून त्यामुळे कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे.

लसीकरणासोबत मास्क आणि टेस्टिंगची गरज - डब्ल्यूएचओ
डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस यांनी सांगितले की, कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण सर्वात मजबूत उपाय आहे. परंतु, यासोबतच मास्क, सामाजिक अंतर, स्वच्छता, चाचणी, आयसोलेशन हे पण तेवढेच गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

आतापर्यंत जगात 13.72 कोटी प्रकरणे
जगात आतापर्यंत 13.72 कोटी लोक कोरोना महामारीच्या विळ्याख्यात आले असून यामध्ये 29.59 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यातील 11.04 कोटी लोक बरे झाले आहे. जगात आजघडीला 2.38 कोटी लोकांवर उपचार सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...