आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Coronavirus Outbreak World Cases & Vaccination LIVE Updates; USA India Brazil France Russia Turkey UK Argentina Novel Corona Covid 19 Death Toll World Today Italy Germany Coronavirus News

कोरोना जगात:मृतांचा आकडा 50 लाखांच्या जवळ, 7 लाख मृत्यू केवळ अमेरिकेत; डेल्टा व्हेरिएंट सर्वात मोठे कारण

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत 7 लाख मृतांचा आकडा पार

जगभरात कोरोना व्हायरस महामारीमुळे जीव गमावणाऱ्यांचा आकडा 50 लाखांच्या जवळपास पोहोचला आहे. जगात जवळपास 49.97 लाख लोकांनी कोरोना संक्रमणामुळे जीव गमावला आहे. रॉयटर्सनुसार, यामधून 25 लाख मृत्यू एका वर्षापेक्षा जास्त वेळेत झाले आहेत. तर पुढील 25 लाख मृत्यू होण्यास केवळ 236 दिवस म्हणजेच 8 महिन्यांपेक्षाही कमी वेळ लागला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे असे झाले, कारण यावेळी डेल्टा व्हेरिएंटने थैमान घातले होते.

गेल्या सात दिवसात जगातील 8 हजार लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. म्हणजेच दर 5 मिनिटांनी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अमेरिका, रशिया, ब्राझील, मॅक्सिको आणि भारतामध्ये गेल्या सात दिवसांत जगातील सरासरी मृत्यूंपैकी निम्म्याहून अधिक मृत्यू झाले आहेत. अहवालानुसार, गेल्या काही आठवड्यांमध्ये जगातील कोरोना मृत्यू दर कमी झाला आहे.

अमेरिकेत 7 लाख मृतांचा आकडा पार
कोरोना संसर्गामुळे जगातील सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. येथे 7.02 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. देशातील लसीबद्दल अफवांमुळे, मोठ्या संख्येने लोक डोस घेणे टाळत आहेत. येथील सुमारे एक तृतीयांश लोकसंख्येने लसीकरण केलेले नाही.

रशियात एका दिवसात 887 मृत्यू
शुक्रवारी, रशियामध्ये कोरोनामुळे 887 मृत्यूंची नोंद झाली, जी कोरोना महामारी सुरू झाल्यापासून एका दिवसात सर्वाधिक मृत्यू आहे. देशातील केवळ 33% लोकसंख्येला ही लस मिळाली आहे.

भारतात परिस्थिती सुधारली आहे
दुसऱ्या लाटेदरम्यान, भारतात डेल्टा व्हेरिएंटमुळे दिवसाला सरासरी 4000 मृत्यू झाले होते. परंतु लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर ही सरासरी फक्त 300 वर आली आहे. डेल्टा व्हेरिएंट सध्या जगातील कोरोना विषाणूचा सर्वात धोकादायक व्हेरिएंट आहे. 194 देशांमधून 187 देशामध्ये हा व्हेरिएंट रिपोर्ट करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...