आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगात कोरोना:जगभरात आतापर्यंत 1 लाख 8 हजार मृत्यू : अमेरिकेत प्रथमच सर्व 50 राज्यात आपत्तीची घोषणा, नेपाळमध्ये 3 भारतीय संक्रमित

वॉशिंग्टन3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगभरात 17 लाख 79 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग तर 4 लाखांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले

जगभरात 17 लाख 79 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 1 लाख 8 हजार 770 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 4 लाख 2 हजार 709 लोक बरे झाले आहेत. न्यूयॉर्क टाइम्सनुसार कोरोनाचा सामना करण्यासाठी अमेरिकन सरकारने पहिल्यांदाज सर्व 50 राज्यांमध्ये एकाचवेळी आणीबाणीची घोषणा केली. शनिवारी आपत्ती जाहीरनामा देण्यात येणारा वायमिंग हे शेवटचे राज्य होते. येथे अद्याप कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 20 हजार 580 लोकांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले तीन भारतीय संक्रमित मिळाले. ते राजधानी काठमांडूहून 135 किलोमीटर दूर बीरगंज येथील एका मशीदीत थांबले होते. येथे 15 एप्रिलपर्यंत लॉकडाउन आहे. 

अमेरिका : 24 तासांत 1,920 लोकांचा मृत्यू 

कोरोनाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या अमेरिकेत 24 तासांत 1,920 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच अमेरिकेतील मृतांचा आकडा 20 हजार 577 वर पोहोचला आहे. हा आकडा इटलीपेक्षा (19 हजार 468) जास्त आहे. येथे शुक्रवारी 30 हजारांपेक्षा जास्त प्रकरणे मिळाली. अमेरिकेत आतापर्यंत 5 लाख 32 हजार 879 लोक संक्रमित झाले आहे. तर शनिवारी भारतातून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधी अमेरिकेच्या नेवार्क विमानतळावर पोहोचल्याचे अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजीत सिंह संधू यांनी सांगितले. 

जगभरात 22 हजाराहून अधिक आरोग्य कर्मचारी संक्रमित: डब्ल्यूएचओ

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका रिपोर्टनुसार, जगातील 52 देशांमध्ये कोरोनाविरोधात लढणारे 22 हजार 73 आरोग्य कर्मचारी संक्रमित आहेत. या कर्मचाऱ्यांना काम करताना किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मास्क, गॉगल्स, ग्लव्स आणि गाउन यांसारखी वैयक्तिक संरक्षण साधने उपलब्ध करावीत. तसेच आरोग्य कर्माचाऱ्यांनी सुरक्षा करायला हवी, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. 

ब्रिटनः पंतप्रधान जॉन्सन यांनी एनएचएस जवानांचे आभार मानले

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इन्टेसिव्ह केअरमधून निघाल्यानंतर निवेदन दिले आहे. युके प्रेस असोसिएशननुसार, जॉन्सन यांनी सेट थॉमस रुग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) कर्मचाऱ्यांचे आभार मानले. ते म्हणाले मी त्यांचे कितीही आभार मानले तरी कमीच आहे. त्यांचे आयुष्यभर त्यांचा आभारी आहे. पंतप्रधान जॉन्सन यांना 27 मार्च कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते. यानंतर 6 एप्रिल रोजी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. 9 एप्रिल रोजी त्यांना आयसीयूतून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले

इटली : एकूण 19 हजार 468 लोकांचा मृत्यू 

इटलीमध्ये 24 तासांत 619 लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील पाच दिवसांत शुक्रवारी मृतांचा आकडा वाढला आहे. याआधी 7 एप्रिल रोजी 604 आणि 10 एप्रिल रोजी 570 लोकांचा मृत्यू झाला होता. इटलीत आतापर्यंत एकूण 19 हजार 468 लोक मृत्यूमुखी पडले तर संक्रमणाचे 1 लाख 52 हजार 271 प्रकरणे आहेत. 

दक्षिण कोरिया : 24 तासांत तिघांचा मृत्यू 

दक्षिण कोरियात 24 तासांत 32 नवीन कोरोना संक्रमणाचे प्रकरणे समोरी आली आहेत. तर तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. काल येथे 27 प्रकरणे समोर आली होती. दक्षिण कोरियात आतापर्यंत 10 हजार 512 प्रकरणे समोर आली असून 214 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. 


नेपाळ :  भारतातील परिस्थिती सुधारेपर्यंत लॉकडाउन का
यम

बीबीसीनुसार, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी शनिवारी म्हटले की, भारतातील परिस्थिती सुधारेपर्यंत नेपाळमध्ये लॉकडाउन कायम राहील. त्यांनी देशातील सर्व सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे चर्चा केली. नेपाळमध्ये आतापर्यंत 9 प्रकरणे समोर आली आहेत.  

सौदी अरेबिया : राजाने कर्फ्यू मुदतवाढीस मान्यता दिली

सौदी अरेबियाचे राजा सलमान बिन अब्दुलअजीज अल-सऊद यांनी देशातील लॉकडाउनच्या मुदतवाढीस मंजुरी दिली आहे. गृहमंत्रालयाने लोकांना त्यांच्या सुरक्षेसाठी कर्फ्यूचे पालन करण्यास सांगितले आहे. कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मार्चमध्ये कर्फ्यू लावण्यात आला होता. आतापर्यंत सौदी अरेबियात 10 हजार 512 जणांना संसर्ग झाला आहे, तर 52 लोक मृत्युमुखी पडले आहेत.

बातम्या आणखी आहेत...