आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगात कोरोना:WHOने म्हटले - ऑस्ट्रेलियामधील मेलबर्नमध्ये नवीन क्लस्टर सापडला, संक्रमितांच्या उपचारात अस्थमाची औषधी ठरू शकते उपयोगी

वॉशिंग्टन23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगात आतापर्यंत 10.78 कोटींपेक्षा जास्त संक्रमित, 23.63 लाख मृत्यू, 7.98 कोटी कोरोनामुक्त

जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 10.78 कोटी पेक्षा जास्त झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 7 कोटी 98 लाखांपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली. जगभरात आतापर्यंत 23 लाख 63 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी www.worldometers.info/coronavirus नुसार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य मंत्रालयाने एका क्वारंटाइन हॉटेलमध्ये 8 संक्रमित आढळल्यानंतर संपूर्ण परिसरात चाचणी आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या एका निवदेनानुसार, ज्या हॉटेलमध्ये इतर देशांतून आलेल्या लोकांना क्वारंटाइन करण्यात आले होते, ते सर्व सुरक्षित आहेत. मात्र 8 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका आहे, त्यामुळे या परिसरातील रहिवाशांची तत्काळ चाचणी करण्यास सांगितले आहे. संक्रमित लोक कोणाच्या संपर्कात आलेत याचाही शोध घेतला जात आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने सलग 100 दिवसांचा लॉकडाउन ठेवला होता. या शहरातच 800 लोकांचा मृत्यू झाला आहे.

अ‍ॅस्ट्रॉजेनिका लस प्रभावी

अ‍ॅस्ट्रॉजेनिका आणि आणि ऑक्सफोर्डची लस सर्व प्रौढांसाठी प्रभावी असल्याचे WHO ने म्हटले आहे. संघटनेचे हे विधान महत्त्वाचे आहे कारण दक्षिण आफ्रिकेने हे वापरण्यास बंदी घातली होती आणि असे म्हटले होते की ते 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिले जाऊ शकत नाही कारण ते प्रभावी असल्याचे सिद्ध झाले नाही. आता WHO ने म्हटले की, ही लस दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नवीन व्हेरियंट विरुद्ध देखील तितकीच प्रभावी आहे, जितकी जुन्या व्हायरस विरोधात आहे. संघटनेने तर ही लस देण्याचा सल्ला दिला आहे. ही लस दोन डोसमध्ये देण्यात यावी असेही संघटनेने म्हटले आहे.

अस्थमाच्या औषधावर चांगली बातमी

अस्थमा असलेल्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. 'द गार्डियन’च्या एका रिपोर्टनुसार अस्थमाने पीडित कोविड-19 च्या संक्रमितांच्या उपचारात अस्थमाची औषधी प्रभावी होऊ शकते. तथापि, अहवालात असेही म्हटले की, संसर्गाची पुष्टी झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच हे औषध द्यावे, कारण केवळ सुरुवातीच्या टप्प्यावरच त्यावर नियंत्रण मिळवता येते. संसर्गाच्या प्रारंभाच्या वेळी ही लक्षणे इतकी घातन नसतात जितकी ती नंतर होतात. अद्याप अस्थामाच्या कोणत्याही विशिष्ट औषधाचे नाव दिले गेले नाही.

बातम्या आणखी आहेत...