आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की कोरोना विषाणू हा जगात येणारी अखेरची महामारी नाही. हवामान बदल आणि प्राणी कल्याणशी निपटल्या शिवाय मानवी आरोग्य सुधारण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाहीत. WHO प्रमुख टेड्रोस गेब्रयेसस म्हणाले की कोरोनाविरूद्धच्या लढाईत फक्त पैसे टाकून काहीही केले जाणार नाही. आपल्याला भविष्यासाठीही तयारी करावी लागेल.
त्यांनी म्हटले की, आपण एका आपत्तीपासून निपटण्यासाठी पैशांचा वापर करतो आणि जेव्हा ती आपत्ती दूर होते, तेव्हा आपण या आपत्तीला विसरुन जातो. भविष्यात अशा समस्यांपासून बचाव करण्यासाठी आपण पाऊल उचलणे बंद करतो. यामुळे योग्य ती पाऊले उचलणे गरजेचे आहे.
तसेच, ब्रिटेनमध्ये आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनमुळे संक्रमित रुग्ण दुसऱ्या देशांमधूनही समोर येत आहेत. जापान आणि फ्रांससनंतर स्पेन, कॅनडा आणि स्वीडनमध्येही याची प्रकरणे समोर येत आहेत. शनिवारी स्वीडनमध्ये या नवीन स्ट्रेनचा एक आणि कनाडामध्ये दोन प्रकरणे समोर आली. स्वीडनच्या हेल्थ एजेंसीने सांगितले की, ब्रिटनमधून परतलेला एक प्रवासी आजारी पडल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. तपासणीत कोरोनाच्या नव्या रुपाची पुष्टी झाली. तसेच, कॅनडामध्ये आढळलेले दोन रुग्ण नुकतेच ब्रिटनमधून परतलेले होते.
जगात कोरोना रुग्णांचा आकडा 8.07 कोटींपेक्षा जास्त आहे. 5 कोटी 68 लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 17 लाख 64 हजारांपेक्षा जास्त लोकांनी जीव गमावला आहे. हे आकडे www.worldometers.info/coronavirus नुसार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.