आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Coronavirus Pandemic Country Wise Cases LIVE Update 5 Feb; USA Pakistan China Brazil Russia France Spain Recovery Rate Covid 19 Cases

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना जगात:अमेरिकेत दोन आठवड्यात 40 हजार मृत्यू, स्वीडन आणि डेनमार्क डिजिटल व्हॅक्सीन पासपोर्ट देणार

वॉशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगभरात 10.53 कोटी लोक संक्रमित, 22.92 लाख रुग्णांचा मृत्यू

जगातील कोरोना रुग्णांचा आकडा 10.53 कोटींच्या पुढे गेला आहे. यातील 7 कोटी 70 लाखांपेक्षा जास्त लोक ठीक झाले आहेत. तसेच, 22 लाख 9 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची आपला जीव गमावला आहे. हे आकडे www.worldometers.info/coronavirus नुसार आहेत. तिकडे, स्वीडन आणि डेनमार्कने देशातील संक्रमणावर आळा घालण्यासाठी कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. दोन्ही देश काही महिन्यांसाठी डिजिटल व्हॅक्सीन पासपोर्ट जारी करणार आहेत.

स्वीडन आणि डेनमार्कचा निर्णय

स्वीडन आणि डेनमार्क डिजिटल व्हॅक्सीन पासपोर्ट जारी करण्यावर विचार करत आहेत. या अंतर्गत प्रवासापुर्वी दोन्ही देश डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे प्रवाशांची माहिती देणार. यात त्या प्रवाशाचे व्हॅक्सीनेशन झाले का नाही, कधी झाले इत्यादी. ही माहिती स्वीडनचे कॅबिनेट मंत्री आंद्रे येमैन यांनी दिली.

अमेरिकेत संक्रमण सुरुच

अमेरिकेत दोन आठवड्यात कोरोना संक्रमणामुळे 40 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ‘द गार्डियन’च्या रिपोर्टनुसार, या संक्रमणामागे आणि मृत्यूमागे लोकांचा हलगर्जीपणा आहे. या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सुपरबाउल सामन्यांवर काही शहरात बंदी घालण्याचा विचार सरकार करत आहे.

कोरोना संक्रमणातील टॉप-10 देश

देश

संक्रमितमृत्यूठीक झाले
अमेरिका27,273,890466,98817,031,629
भारत10,803,533154,86210,495,401
ब्राझील9,397,769228,8838,291,763
रशिया3,917,91875,2053,389,913
UK3,892,459110,2501,828,510
फ्रांस3,251,16077,595228,472
स्पेन2,881,79359,805N/A
इटली2,570,60889,3442,043,499
तुर्की2,492,97726,2372,379,070
जर्मनी2,239,94359,3861,954,000

(ही आकडेवारी www.worldometers.info/coronavirus/ नुसार आहे)

बातम्या आणखी आहेत...