आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगात कोरोना:ब्रिटनमध्ये आढळलेला कोविड-19 चा नवीन व्हेरियंट 70 देशांमध्ये पसरला, अधिक सतर्क राहण्याचा WHO चा इशारा

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगभरात आतापर्यंत 10.14 कोटींपेक्षा जास्त प्रकरणे, 21.82 लाख मृत्यू; 7.32 कोटी कोरोनामुक्त

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 10.14 कोटी पार झाली आहे. 7 कोटी 32 लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 21 लाक 82 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. ही आकडेवारी www.worldometers.info/coronavirus नुसार आहे. मागील महिन्यातच ब्रिटनमध्ये कोविड-19चा नवीन व्हेरियंट आढळला होता. आता WHO ने याबाबत नवीन चेतावणी जारी केली आहे. कोविड-19चा हा नवीन व्हेरियंट 70 देशांमध्ये पसरल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. दुसरीकडे अमेरिकेत पुन्हा रुग्ण वाढत आहेत.

WHO म्हणाले - अधिक सतर्क रहा

मागील महिन्यात ब्रिटनमध्ये आढळलेला कोविड-19चा नवीन व्हेरियंट अधिक धोकादायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. WHO नुसार, हा व्हेरियंट आतापर्यंत 70 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे. हा व्हायरस अधिक धोकादायक आहे, कारण तो जुन्या व्हायरसपेक्षा वेगवान पसरतो. WHO ने संदर्भात आपला साप्ताहिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. संस्थेने या प्रकाराला B.1.1.7 किंवा VOC 202012/01 असे नाव दिले आहे. दिलासादायक बाब म्हणजे ब्रिटेन, डेन्मार्क, आयर्लंड आणि नेदरलँड्समध्ये या नव्या प्रकारची प्रकरणे झपाट्याने कमी झाली आहेत.

ब्रिटनमध्ये आढळलेला व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या व्हेरियंटपेक्षा वेगळा आहे. WHO नुसार, दक्षिण आफ्रिकेत आढळलेला व्हेरियंट ब्रिटनच्या व्हेरियंट इतका वेगाने पसरत नाही. दक्षिण आफ्रिकेत आढळलेला व्हेरियंट 31 देशांमध्ये पोहोचला आहे.

बातम्या आणखी आहेत...