आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 6.48 कोटींच्या पुढे गेला आहे. यातील 4 कोटी 49 लाखांपेक्षा जास्त लोक ठीक झाले असून, 14 लाख 98 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा जीव गेला आहे. ही आकडेवारी www.worldometers.info/coronavirus नुसार आहे.
फ्रांसच्या माजी राष्ट्रपतीचे निधन
फ्रांसचे माजी राष्ट्रपती वेलेरी गिसकार्ड डिएस्टेंग यांचे कोरोना संक्रमणामुळे निधन झाले. 94 वर्षीय वेलेरी यांना यूरोपीय देशांना एकत्रित करण्यासाठी ओळखले जाते. 1974 ते 1981 पर्यंत ते राष्ट्रपती पदावर होते. त्यांना काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास सुरू झाला होता, यानंतर रुग्णालयात भरती करण्यात आले होते. बुधवारी त्यांचा त्रास परत सुरू झाला, रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचे, त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.
अमेरिकेत एप्रिलनंतर एका दिवसातील सर्वाधिक मृत्यू
अमेरिकेत बुधवारी संक्रमणामुळे 2 हजार 957 रुग्णांचा मृत्यू झाला. जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटीनुसार, हा 15 एप्रिलनंतरचा एका दिवसातील सर्वात मोठा आकडा आहे. 15 एप्रिलला 2 हजार 607 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
इंटरपोलचा इशारा
इंटरपोलने बुधवारी रात्री एक ग्लोबल अलर्ट जारी केला आहे. यात सर्व देशांना म्हटले की, कोविड-19 च्या काळात काही लोक बनावट कोरोना व्हॅक्सीन सप्लाय करू शकतात. पॅरिस मुख्यालयकडून सांगण्यात आले की, याबाबत एजंसीने 194 देशांना अलर्ट जारी केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.